शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरवासीयांना टोलमुक्ती मिळणार?

By admin | Updated: August 12, 2015 02:38 IST

कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वी तेथील रहिवाशांना टोलमुक्ती देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. आयआरबी कंपनीने ५५० कोटी रुपयांची मागणी केली आहे तर राज्य सरकारने नेमलेल्या

मुंबई : कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वी तेथील रहिवाशांना टोलमुक्ती देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. आयआरबी कंपनीने ५५० कोटी रुपयांची मागणी केली आहे तर राज्य सरकारने नेमलेल्या समित्यांनी २३९ कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. हा तिढा सोडवण्याकरिता मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून पंधरा दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत टोल वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.ज्येष्ठ शेकाप नेते एन. डी. पाटील आणि कोल्हापूरच्या महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. कोल्हापूरच्या टोलमाफीबाबत यापूर्वी पुनर्मूल्यांकन समिती व आयआयटी यांच्या समितीने आपले अहवाल सरकारला सादर केले आहेत. या अहवालात काही विसंगती असल्याने एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यामध्ये राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच आयआरबीचे दोन व कोल्हापूरमधील टोलविरोधी कृती समितीचे दोन प्रतिनिधी असतील. याखेरीज कोल्हापूर महापालिका आयुक्तांचाही समितीमध्ये समावेश केलेला आहे. पुढील १५ दिवसांत ही समिती टोलमुक्तीचा अंतिम निर्णय घेईल.आयआरबी कंपनीने टोलमुक्तीकरिता ५५० कोटी रुपयांची मागणी केली आहे तर सरकारने नेमलेल्या समित्यांनी २३९ कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. शिंदे यांची समिती कोल्हापूरचा टोल बंद करण्याकरिता सरकारने किती रक्कम द्यायची याची शिफारस सरकारला करील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. आयआरबीने कोल्हापूरमधील रस्त्यांकरिता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई करु, असे शिंदे यांनी सांगितले. आयआरबीने कोल्हापूरच्या रस्त्यांची दुर्दशा केली असल्याने त्यांना पैसे देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची मागणी एन.डी. पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)