शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोकणासह कोल्हापूर, साताऱ्यात पाऊस

By admin | Updated: June 9, 2016 05:46 IST

मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली

कोल्हापूर/पणजी : मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार सरी बरसल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात झोडपून काढले तर थंड हवेचे ठिकाण असणारा महाबळेश्वर या पावसाने चिंब भिजला. गोव्यातही बऱ्याच ठिकाणी दमदार पाऊस झाला. खेड (जि. रत्नागिरी) तालुक्यात वीज पडल्याने मायलेक जखमी झाले.कोकणात सिंधुदुर्गात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात झाला. खेडमध्ये दुपारी तीनपासून पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील निंगडे गावी एका घरावर वीज पडून अंजली सुनील तांबे (४0) आणि त्यांचा मुलगा सुजल हे दोघेजण जखमी झाले असून त्यांना कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोव्यातही संततधार पावसाने सलामी दिली. यामुळे पणजीतील रस्ते जलमय झाले. तासाभरात एक इंचाहून जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मडगाव, खोतीगाव, काणकोण आणि सांगे परिसरातही पाऊस झाला.कोल्हापूरात दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुरू झाले. त्यात पावसाची हलकी सर पडू लागली. सायंकाळी पाचनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहण्याचे प्रकार घडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वीज पडून मुलगा ठारसिंधुदुर्गनगरी : शिडवणे कोनेवाडी येथील वेंदात विजय पाटणकर (८ वर्ष ) वीज पडून मृत्यूमुखी पडला. वेदांत गोठ्यातील गुरांना चारापाणी देण्यासाठी गेला होता.त्याला कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तत्पुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.