शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

कोल्हापूर : पैलवान ठरले; शड्डू घुमणार--‘दक्षिण’मधून राष्ट्रवादी गायब

By admin | Updated: October 2, 2014 00:26 IST

राधानगरीत काँग्रेस उमेदवारांची माघार--शिरोळमध्ये जातीय राजकारणाची उसळी--चंदगडमध्ये सर्वाधिक बंडखोरीचा सामना

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी माघारीदरम्यान आज, बुधवारी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामध्ये ‘कोल्हापूर दक्षिण’मधून राष्ट्रवादीच्या दुर्वास कदम, तर राधानगरी-भुदरगडमध्ये कॉँग्रेसच्या बजरंग देसाई या अधिकृत उमेदवारांसह सर्व इच्छुकांनी अर्ज मागे घेतला. शिरोळला जातीच्या राजकारणाने उसळी घेतली. तिथे धैर्यशील माने यांच्यासह माघार घेतलेल्या सर्वपक्षीय उमेदवारांनी शिवसेनेच्या उल्हास पाटील यांना पाठिंबा दिला. चंदगडला राष्ट्रवादीसह जनसुराज्य व काँग्रेसलाही बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.मतविभागणीने चुरस अटळ:::कोल्हापूर उत्तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अर्ज माघारीनंतर पंचरंगी लढतीचे चित्र समोर आले आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सत्यजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुरेश साळोखे व भाजपचे महेश जाधव अशी ही लढत होत आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत आमदार क्षीरसागर यांना अगदीच एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मतविभागणीमुळे आता काहीही घडू शकते, या टप्प्यावर आली आहे. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘अपक्ष’ म्हणून भरलेला अर्ज मागे घेतला.राष्ट्रवादी ठरवून ‘गायब’कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दुर्वास कदम यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमल महाडिक व शिवसेनेचे विजय देवणे यांच्यात लढत होईल. राष्ट्रवादीच्या दुर्वास कदम यांचा अर्ज मंजूर झाल्यामुळे डमी उमेदवार बाबा सरकवास यांचा अर्ज बाद झाला. परंतु, तोपर्यंत कदम यांनीही माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे चिन्हच या मतदारसंघातून गायब झाले. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या उजळाईवाडीच्या राजू माने यांनीही अपेक्षेप्रमाणे माघार घेतली.राष्ट्रवादी कोणाच्या पथ्यावर ?करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे पी. एन. पाटील, शेकाप-जनसुराज्य आघाडीचे राजू सूर्यवंशी, भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केरबा चौगले यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने या मतदारसंघात उमेदवारच न उभा करता जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारास पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीस याच मतदारसंघातून निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे खरचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जनसुराज्यच्या पाठीशी राहणार की, लोकसभेत ‘विशेष’ मदत करणाऱ्या सहकाऱ्याची परतफेड करणार, यावरच विजयाचे गणीत आहे.सर्वच पक्षांत बंडखोरीचंदगड मतदारसंघात राष्ट्रवादीसह काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनसुराज्य शक्ती पक्षातही बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर विरुद्ध काँग्रेसचे भरमू पाटील यांच्यातच लढतीचे प्राथमिक चित्र पुढे आले आहे. भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर, शिवसेनेचे नरसिंगराव पाटील व जनता दलातर्फे स्वाती कोरी रिंगणात आहेत. ‘दौलत’चे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील व शिवसेनेचे सुनील शिंत्रे यांनी माघार घेतली. गोपाळराव पाटील कुणाला पाठिंबा देणार, हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीत काकींच्या विरोधात बंड करून पुतण्या संग्रामसिंह कुपेकर जनसुराज्य पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमवेत पक्षाचे फक्त चिन्हच आहे. त्या पक्षाचे प्रकाश चव्हाण हे राष्ट्रवादीचे बंडखोर अप्पी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून ओम साई उद्योग समूहाचे संभाजीराव देसाई यांनी बंडखोरी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून नितीन पाटील यांनी बंड केल्याने गड्ड्यान्नावर यांचीही वाट बिकट झाली. आजरा तालुक्यातील जयवंत शिंपी यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.दोन मतदान यंत्रेकोल्हापूर उत्तर व चंदगड मतदारसंघात प्रत्येकी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. एका मतदान यंत्राची क्षमता पंधरा उमेदवारांची असते व एक मतदान ‘नोटा’साठी देता येऊ शकते. त्यामुळे उत्तर व चंदगड मतदारसंघांत दोन मतदान यंत्रे वापरावी लागणार आहेत.जातीच्या राजकारणाला उसळीजैन, लिंगायत विरुद्ध मराठा अशा जातीच्या राजकारणाने या निवडणुकीत एकदम उसळी घेतली. काँग्रेसचे आमदार सा. रे. पाटील, शिवसेनेचे उल्हास पाटील, भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे रिंगणातील प्रमुख उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव व ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील या मातब्बर उमेदवारांनी माघार घेतली. त्यांनी मराठा समाजाचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उल्हास पाटील यांना पाठिंबा दिला. गटाच्या एकनिष्ठेवरच निर्णयकागदावर पंचरंगी लढत दिसत असली तरी ती खरी तिरंगीच आहे. जनसुराज्यचे विनय कोरे, शिवसेनेचे सत्यजित पाटील, भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरसिंह पाटील, काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर या उमेदवारांचा समावेश आहे. पन्हाळ्यात कोरे किती मते घेतात व सत्यजित यांना शाहूवाडी किती बळ देते, यावरच निकाल असेल.एकास-एक लढतीचेच चित्रराष्ट्रवादीचे आमदार के. पी. पाटील, शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आणि भाजप-स्वाभिमानी आघाडीचे प्रा. जालंदर पाटील, अपक्ष उमेदवार विजयमाला देसाई, असे प्रमुख उमेदवार असले तरी खरी लढत के. पी. पाटील व प्रकाश आबिटकर यांच्यातच होणार आहे. आज, बुधवारी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार बजरंग देसाई यांच्यासह हिंदुराव चौगले, अरुण डोंगळे, सत्यजित जाधव व राहुल देसाई यांनी माघार घेतली. करवीरमध्ये काँग्रेसचे पी. एन. पाटील यांच्याविरोधात उमेदवारच न देण्याचा डाव या मतदारसंघात काँग्रेसने राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांच्यावर उलटविला. आवाडे-हाळवणकर थेट लढतगतनिवडणुकीप्रमाणेच भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर विरुद्ध काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे हे आमने-सामने ठाकले आहेत. राष्ट्रवादीचे मदन कारंडे व शिवसेनेचे मुरलीधर जाधव हे देखील रिंगणात आहेत. आज माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा सत्त्वशील माने व नगरसेवक तानाजी पोवार यांनी माघार घेतली. माने यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता.दोन आवळे विरुद्ध मिणचेकरकाँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे, जनसुराज्यचे माजी आमदार राजू किसन आवळे विरुद्ध शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात लढत होईल. या मतदारसंघातून त्यांच्याशिवाय भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय घाटगेही रिंगणात आहेत. तब्बल तेरा अपक्षांनी माघार घेतल्याने मतदानयंत्रांवरील गर्दी कमी झाली.कुस्ती मुश्रीफ-घाटगेंमध्येचराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संजय घाटगे, भाजप-स्वाभिमानी आघाडीचे परशुराम तावरे व काँग्रेसचे संतान बारदेस्कर हे प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी ही लढत मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे, अशीच होणार आहे. काँग्रेसचा उमेदवारही तांत्रिकदृष्ट्याच रिंगणात आहे. या मतदारसंघातही काँग्रेसने शिवसेनेलाच मदत होईल, अशी भूमिका जाणीवपूर्वक घेतली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व मुश्रीफ यांच्यातील भोगावती कारखान्यातील संघर्षाचा व त्यातून राष्ट्रवादीने करवीर मतदारसंघातून उमेदवारच न उभा करण्याच्या राजकारणाचा हा परिपाक आहे. ज्येष्ठ व तरुण उमेदवारशिरोळमधून काँग्रेसकडून ९३ वर्षांचे राज्यातीलच नव्हे, तर ‘देशातील सर्वांत ज्येष्ठ उमेदवार’ म्हणून आमदार सा. रे. पाटील रिंगणात आहेत, तर ‘कोल्हापूर दक्षिण’मधून भाजपकडून ‘सर्वांत तरुण उमेदवार’ म्हणून अमल महाडिक (वय ३५) रिंगणात आहेत. तीन महिला रिंगणात ‘चंदगड’मधून आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याविरोधात स्वाती कोरी या जनता दलातर्फे रिंगणात आहेत. त्याशिवाय भुदरगड तालुक्यातील इंदिरा महिला सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई या राधानगरी मतदारसंघातून अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.