शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

‘परिपूर्ती’ विश्वकोश निर्मितीच्या ज्ञानयज्ञाची

By admin | Updated: June 19, 2015 01:57 IST

स्व. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पाहिलेले मराठी विश्वकोशाच्या संहिता खंडांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे.

मुंबई : स्व. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पाहिलेले मराठी विश्वकोशाच्या संहिता खंडांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे. जणू काही मुंगी होऊन सतत काम केलेल्या डॉ. विजया वाड यांच्या कारकिर्दीत मराठी भाषेतील हा महाप्रकल्प तडीस गेल्याने मराठी विश्वकोश कोशात न राहता विश्वात आला आहे.खंड २० (उत्तरार्ध) हा परिपूर्तीचा खंड असून हर्षवर्धन, सम्राट ते ज्ञेयवाद असा नोंदीचा प्रवास यात आहे. या उत्तरार्धात ६३६ नोंदी आणि १८ चित्रपत्रे आहेत. या खंडातील शांता हुबळीकर, सुमती क्षेत्रमाडे, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, क्ष-किरण- वैद्यकीय, अहिल्याबाई होळकर, क्षेपणास्त्रे, हॉडुरस, ज्ञेयवाद, हाँगकाँग, होनोलुलु अशा किती तरी नोंदी वाचनीय झाल्या आहेत. चित्रपत्रे तर अतिशय आकर्षक आहेत. त्याची पहिली प्रत तर्कतीर्थांचे सुपुत्र वासुदेवशास्त्री यांनी डॉ. वाड यांच्या उपस्थितीत वाईच्या महागणपतीस नुकतीच अर्पण केली. विद्यमान अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या कारकिर्दीत खंड १७, खंड १८, १९, २० (पूर्वार्ध व उत्तरार्ध ) तयार झाले. कुमारकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग १, २, बोलका विश्वकोश (कुमारकोश) तसेच ब्रेलकोश तयार झाला. २२ तासांची कन्याकोशाची सीडी नामवंत निवेदकांच्या आवाजात रेकॉर्ड झाली.फक्त महानगरातच अशी भव्य भाषिक कामे होतात हा समज खोटा ठरवीत वाई सारख्या चिमुकल्या गावात विश्वकोशाचे एक ते २० खंड निर्माण झाले याचा मला अभिमान वाटतो . - डॉ. विजया वाड, अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ.विश्वकोशाच्या १८० ग्रंथवाचन स्पर्धा महाराष्ट्रभर घेऊन विद्यमान अध्यक्षांनी विश्वकोश लोकाभिमुख केला. सर्वात मोठे काम म्हणजे  www.marathivishwakosh.in ही सीडॅक, पुणे यांच्या मदतीने तयार झालेली वेबसाइट. सदर वेबसाइट राज्य, राष्ट्रीय व आशियाई पुरस्कारांनी सन्मानित आहे. एमपीएससी, यूपीएससी, अन्य स्पर्धा परीक्षा यांसाठी तिचा प्रचंड उपयोग होतो. १०५ देश व १६ लक्ष वाचक या साइटला लाभले आहेत.