शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जानकर शिवसेनेसोबत जाणार?

By admin | Updated: January 5, 2016 03:20 IST

राष्ट्रवादीच्या टग्यांचा माज जिरवला आहे. आता भाजपाला धडा शिकविणार आहे़ त्यांच्या सत्तेच्या गाजराला मी ठोकर मारतो

जामखेड(अहमदनगर) : राष्ट्रवादीच्या टग्यांचा माज जिरवला आहे. आता भाजपाला धडा शिकविणार आहे़ त्यांच्या सत्तेच्या गाजराला मी ठोकर मारतो. गरज पडली तर मी शिवसेनेसोबत राहील, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला. राज्यात भाजपाची सत्ता आणण्यासाठी १८० सभा घेतल्या. पक्षाने स्व:खर्चाने हेलिकॉप्टर घेतले़ भाजपाकडून दमडीही घेतली नव्हती. सत्ता आल्यावर यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. आता ते मित्रपक्षाला दुश्मन समजतात, असेही त्यांनी सांगितले़जानकर म्हणाले, भाजपाची स्थापना दिल्लीत तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांची स्थापना मुंबईत झाली. मात्र रासपाची स्थापना राजमाता अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी चौंडी येथे वीस वर्षापूर्वी झाली. त्यामुळे या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे. सध्याचे मंत्री राम शिंदें यांना आमच्यामुळे मंत्री पद मिळाले. मात्र, ते आता विसरले असून, मंत्रीपदाचा वापर आमच्या उमेदवाराला धमकावण्यासाठी करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला़ (तालुका प्रतिनिधी)पुढच्या निवडणुकीत भाजपाविरोधात लढणारराष्ट्रवादी हा तर गुंडांचा पक्ष आहे. बारामतीत आम्ही पवार घराण्याविरोधात लढतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन पवारांचा उदोउदो करतात. तुम्ही काय मित्रपक्षाला गाडायला निघाले काय? असा सवाल करून जानकर म्हणाले, पुढच्या निवडणुका भाजपाविरोधात लढू़ लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत रासपा पूर्ण ताकदीने उतरणार आहे़ भाजपाला हरविणे, हेच आमचे टार्गेट असल्याचे सांगत त्यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे निवडणूक लढवतील, असे त्यांनी सांगितले़