शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या दबावाखालील पृथ्वी

By admin | Updated: July 14, 2016 20:09 IST

मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही वसुंधरेची वाटचाल दिवसेंदिवस मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून

रमण विज्ञान केंद्रात प्लॅनेट अंडर प्रेशर : मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून बिकटतेकडे वाटचालनागपूर : मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही वसुंधरेची वाटचाल दिवसेंदिवस मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून बिकटतेकडे होत आहे. बेसुमार जंगलतोड, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, अतिऔद्योगिकीकरण, वातानुकूलित उपकरणांचा उपयोग, वाहनांचा वाढता वापर आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती आदी अनेक कारणांच्या दबावाखाली पृथ्वी आली आहे. याबाबत जनजागृती निर्माण करून त्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्याची माहिती देणारे प्रदर्शन ह्यप्लॅनेट अंडर प्रेशरह्ण रमण विज्ञान केंद्रात सुरू झाले आहे. या प्रदर्शनात विविध थ्रीडी मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. माहिती देणारे पॅनल्स, (माहिती पटल) व्हिडिओ, ह्यअ‍ॅनिमेशन डेस्कह्ण याद्वारे विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती देताना रमण विज्ञान केंद्राचे अधिकारी अभिमन्यू भेलावे म्हणाले, विकासाच्या नावाखाली शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत आहे. आज वीज नसेल तर हवा, पाणी आणि अन्न बंद अशी स्थिती महानगरांची झाली आहे, हे आजचे वास्तव आहे. या सर्वांचा दबाव पृथ्वीवर पडत आहे. सूर्यापासून जी उष्णता मिळते पृथ्वी ती काही प्रमाणात शोषून घेते व थोड्या प्रमाणात बाहेर टाकते. परंतु आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने व कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे शोषलेले तापमान पुरेशा प्रमाणात टाकण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून ह्यग्लोबल वॉर्मिंगह्णला सामोरे जावे लागत आहे. दुसरे म्हणजे, पृथ्वीला थंड कसे राखायचे हाही एक दबावाचा भाग आहे. हा दबाव कमी करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी वैकल्पिक साधने काय, या सर्वांची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घराघरात पोहचावे यासाठी हे प्रदर्शन आहे.