मंचर : भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़ त्याचा वापर आपल्या राजकीय जीवनात मोठय़ा खुबीने सुरू आहे म्हणून जनतेने खरा इतिहास जाणून घेऊन त्याद्वारे वर्तमान परिस्थितीचे आकलन करून घ्यावे, असे उद्गार कॉमेड गोविंद पानसरे यांनी काढल़े
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘शिवनेरी’ नियतकालिकाच्या प्रकाशनप्रसंगी पानसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव बेंडे-पाटील होत़े याप्रसंगी विचारपीठावर उपप्राचार्य डॉ़ प्रल्हाद काळे,
दयानंद खेडकर, संतोष बाणखेले, प्रभाकर पारधी, तसेच विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होत़े
प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉ़ पांडुरंग गायकवाड यांनी केल़े शिनेरीचे संपादक प्रा़ संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केल़े
सूत्रसंचालन प्रा़ भाऊसाहेब सांगळे आणि प्रा़ वैशाली सुपेकर यांनी केले. प्रा़ सुखदेव कोल्हे यांनी आभार मानल़े (वार्ताहर)
आपल्या सामाजिक, शैक्षणिक जीवनात मोठीच पडझड सुरू आह़े संस्कृतीच्या नावाखाली एक विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरला जात असून, अशी माणसे सत्तेच्या केंद्रस्थानी एकवटली आहेत़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली असल्यामुळे काही लोकांना आपली धर्मसत्ता राबविणो कठीण जाते आहे. त्याचमुळे घटनाबदलाचा अट्टहास ते धरीत आहेत़ त्यांना रोखणो गरजेचे आह़े
- कॉमेड गोविंद पानसरे