शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चाकू पाठीत की खांद्यात भोसकला?

By admin | Updated: November 30, 2014 00:56 IST

चाकू पाठीत की खांद्यात भोसकला होता, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत तफावत असल्याची कबुली तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव गिरी यांनी

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या साक्षीत तफावत : तपास अधिकारी माधव गिरी यांची उलट तपासणीत कबुलीनागपूर : चाकू पाठीत की खांद्यात भोसकला होता, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत तफावत असल्याची कबुली तपास अधिकारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव गिरी यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान उलट तपासणीत दिली. राजू सरोदे नावाच्या साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या बयानात असे म्हटले होते की, उंच आणि ठेंगण्या बांध्याच्या दोन मुलांनी चाकू मोनिकाच्या पाठीत भोसकलेला होता. चाकूची मूठ बाहेर दिसत होती. प्रत्यक्ष न्यायालयात साक्ष देताना या साक्षीदाराने चाकू खांद्यात भोसकलेला होता, असे म्हटले होते. साक्षीदाराच्या साक्षीत ही तफावत असल्याचे गिरी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मोरेश्वर धोटे नावाच्या साक्षीदाराने मृत मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे आपल्या साक्षीत सांगितले नव्हते. ११ मार्च २०११ रोजी घटनास्थळी उमेश अवथनकर हा होता आणि त्यानेच तक्रारही दाखल केली होती. मोरेश्वर धोटे यांचे ११ मार्च ते १९ मे २०११ बयान घेतले नाही, कारण ते घटनास्थळी नव्हतेच. फिर्यादी अवथनकर यांनी त्यांना घटनेची सूचना दिली होती. म्हणूनच आपण याबाबत आरोपपत्रात नमूद केले नव्हते. १६ मार्च २०११ रोजी आपण तपास हाती घेतला तेव्हा मृत मुलगी मोनिका कुठे राहत होती, कुठे शिकत होती, याबाबत आपणाला माहिती होती. परंतु तिच्या आई-वडिलांबाबत माहिती नव्हती, असेही गिरी यांनी सांगितले. मोहम्मद मुदस्सर याने न्यायालयात दिलेल्या साक्षीत आपण उमेश अवथनकर याला ओळखतो. तो शिक्षक आहे. अभिनव ट्युशन क्लासेस चालवतो. घटना दर्शन कॉलनी ते श्रीनगर दरम्यान रस्त्यावर पूर्व-पश्चिम दिशेला प्लॉट क्रमांक २० समोर घडली, असे सांगितले होते. मात्र ही माहिती त्याच्या पोलीस बयानात नाही, असेही गिरी यांनी उलटतपासणी साक्षीत कबूल केले. आज गिरी यांची उलटतपासणी साक्ष अर्धवट राहिली. ११ डिसेंबरपासून ती पुन्हा प्रारंभ होणार आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल आणि अ‍ॅड. नितीन हिवसे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)