शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर शिजवला स्वयंपाक

By admin | Updated: July 24, 2016 17:23 IST

वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने त्यांचे हाल होत असून, आज शेकडो विद्यार्थ्यांना चक्क वसतिगृहासमोरील रस्त्यावरच स्वयंपाक करावा लागला.

ऑनलाइन लोकमत,गडचिरोली, दि. 24 - येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने त्यांचे हाल होत असून, आज शेकडो विद्यार्थ्यांना चक्क वसतिगृहासमोरील रस्त्यावरच स्वयंपाक करावा लागला. गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत गडचिरोली शहरात वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांमध्ये वास्तव्य करुन गोरगरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकदा वसतिगृहात प्रवेश मिळाला की दुसऱ्या वर्षी महाविद्यालयाची बोनाफाईड सर्टिफिकेट व गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडून वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया आजतागायत सुरु होती. त्यानुसार यंदा महाविद्यालये १५ जूनपासून सुरु झाल्यानंतर अनेक विद्यार्थी वसतिगृहात राहायला आले. त्यांना दररोज भोजनही मिळत होते. २७ जूनपासून २१ जुलैपासून सर्व सुरळीत होते. परंतु नंतर मात्र अचानक प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूचनेवरून लांजेडा येथील वसतिगृहाच्या अधीक्षिकेने व काही कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास १४ मुलींना वसतिगृहाबाहेर काढले. तसेच पोटेगाव मार्गावरील मुलांच्या वसतिगृहाबाहेर एक नोटीस लावण्यात आला असून, त्यात नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेश यादी मंजूर नसून, भोजन ठेवण्याचे दरही मंजूर झाले नाहीत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत भोजन मिळणार नाही, अशी सूचना लिहिण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. काल या सर्व विद्यार्थ्यांनी आ.डॉ.देवराव होळी यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यानंतर आ.डॉ.होळी यांनी विद्यार्थ्यांना अन्नधान्य, भांडी व गॅस उपलब्ध करुन दिला. परंतु वसतिगृहात भोजन करण्याची मनाई करण्यात आल्याने आज शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला. वसतिगृहात वास्तव्य करु देण्यास प्रकल्प कार्यालयाने नकार दिल्याने अनेक विद्यार्थी गावी गेले असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे