शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पाच वर्षीय अदिबाकडून तीन तासांत ‘कळसुबाई’ सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:32 IST

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील सुमारे साडे पाच हजार फूट उंचीचे महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड या पुरस्काराने अदिबाला गौरविण्यात आले आहे. तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीही स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन तिचा ...

नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील सुमारे साडे पाच हजार फूट उंचीचे महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड या पुरस्काराने अदिबाला गौरविण्यात आले आहे. तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनीही स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन तिचा सन्मान केला.नाशिकमधील लिटर किंग्डम या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिनियर केजीमध्ये शिकणारी अदिबा आरिफ खान या विद्यार्थिनीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला ४०गिर्यारोहकांच्या समुहासोबत सर केले होते. त्यानिमित्त नुकतेच आंध्रप्रदेशमधील विशाखापटट्णमच्या विविध विश्वविक्रमांची नोंद करणाºया ‘वज्र वर्ल्ड रिकॉर्ड’ या संस्थेनेही अदिबाला पुरस्काराने सन्मानित केले आहे.

भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक व मार्क मार्शल आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचे आयोजन २६ जानेवारी रोजी कळसुबाई शिखरावर केले होते. यावेळी अदिबाही ४०गिर्यारोहकांसोबत सहभागी झाली होती. दरम्यान, अदिबाने कोणाचीही मदत न घेता केवळ गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली तीन तासांमध्ये कळसुबाई शिखराची चढाई पूर्ण करत तिरंग्याला सलामी दिली होती. अदिबाला गिर्यारोहणाची आवड लहानवयातच असल्यामुळे आणि याबाबत तिला अभिरुचीही असल्यामुळे तीने सराव कायम ठेवल्यास ती भविष्यात एक उत्कृष्ट महिला गिर्यारोहक म्हणून देशाचे नाव उज्ज्वल करु शकते, असा विश्वास तीच्यासोबत असलेल्या गिर्यारोहकांनी व्यक्त केला आहे. कळसुबाई चढत असताना अदिबाची जिद्द ही कमालीची होती. तिने ठरविलेले ध्येय पूर्ण केले.