शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

किशोरीताई पंचतत्त्वात विलीन

By admin | Updated: April 5, 2017 06:26 IST

आमोणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई : अखंड संगीत साधना व प्रतिभेच्या बळावर शास्त्रीय संगीताला भावतत्त्वाचा स्पर्श देणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शाश्वत सुरांचा ध्यास घेतच अखेरचा श्वास घेतलेल्या या दैवी सुराला निरोप देताना मान्यवरांचे कंठ दाटून आले होते. त्यांच्या निधानामुळे संपूर्ण देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गोव्याचे सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांच्यासह अभिनेता आनंद इंगळे, वैभव मांगले, विक्रम गोखले, भारती आचरेकर, अतुल परचुरे आदी कलाकारांनी अंत्यदर्शन घेतले. पं. शिवकुमार शर्मा, रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर-टिकेकर, महेश काळे, शशी व्यास, सुरेश वाडकर, अजय पोहनकर, डी. के. दातार, मंगेश बोरगावकर आदी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>भारतीय अभिजात संगीताचा अपरिमीत हानी झाली. त्या नसल्या, तरी त्यांचे संगीत आपल्याला निर्मळ आनंद देत राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान>किशोरीतार्इंच्या निधनाने प्रयोगशीलता आणि संवेदना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री >किशोरीतार्इंचे सोमवारी रात्री मुंबईतील निवासस्थानी निधन झाले. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत त्यांचे पार्थिव रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कल्चरल अकादमीच्या सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथून ४ च्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. शिवाजी पार्क स्मशानभूमीत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बिभास व निहार या किशोरीतार्इंच्या दोन मुलांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.