शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

किसान एसएमएस सेवा : बुलडाण्यात १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

By admin | Updated: September 19, 2016 19:47 IST

शेतकऱ्यांना घरबसल्या एसएमएसव्दारे कृषी विषयक सल्ला देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून किसान एसएमएस सेवा सुरू केली आहे.

ऑनलाइन लोकमतजि.बुलडाणा, दि. १९  : शेतकऱ्यांना घरबसल्या एसएमएसव्दारे कृषी विषयक सल्ला देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून किसान एसएमएस सेवा सुरू केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांची आतापर्यंत एसएमएस सेवेमध्ये नोंदणी झाली आहे.

शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे कृषी विषयक सल्ला हा कार्यक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यस्तरावरील १३८ लाख शेतकऱ्यांपैकी किमान ५० लाख शेतकऱ्यांना किसान एसएमएस सेवेमध्ये आणण्याचा शासनाचा मानस आहे. किसान एसएमएस सेवेव्दारे शेतकऱ्यांना घरबसल्या कृषी विषयक विविध योजनांची माहिती, हवामानाचा अंदाज, नवनवीन तंत्रज्ञान, खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करावयाची कामे, फळबाग, भाजीपाला वर्गीय पिकनिहाय माहिती देण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग त्या भागातील शेतीची परिस्थिती आॅनलाईन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडे (आत्मा) पाठविली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे माहिती पाठविली जाते.

या माहितीच्या आधारे त्या भागात पिकावरील रोगराई, किडविषयक सल्ला, पेरणीची वेळ, मशागतीची योग्य वेळ याविषयी सविस्तर माहिती एसएमएसव्दारे पाठविली जाते. तालुका कृषी कार्यालयातील प्रती कृषी सहाय्यक शेतकरी मित्र यांना किमान ५०० शेतकऱ्यांची माहिती नोंदणी करण्याचे लक्षांक दिले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वात्रिक विकासासाठी शासन कृषी विभागाकडून विविध उपाययोजना राबवित असताना आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे.शेतकऱ्यांना मोफत कृषी विषयक सल्ला तसेच पीक हवामानाचा अंदाज याविषयी माहिती देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या किसान एसएमएस सेवेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना यामध्ये सामावून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.- नरेंद्र नाईक, प्रकल्प संचालक (आत्मा)बुलडाणा.