शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Long March : विरोधकांना दूर सारत मुख्यमंत्र्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:28 IST

शेतकरी आंदोलनाचे लाल वादळ मुंबईत दाखल झाल्यावर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेकरांना पाठिंबा जाहीर केला. शेतक-यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकार अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

गौरीशंकर घाळे मुंबई : शेतकरी आंदोलनाचे लाल वादळ मुंबईत दाखल झाल्यावर भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेकरांना पाठिंबा जाहीर केला. शेतक-यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकार अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिताफीने वाटाघाटी करत विरोधकांच्या मनसुब्यांना चांगलाच धक्का दिला.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अंतरावर ठेवत मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकरी नेत्यांशी वाटाघाटी केल्या. शेतकºयांच्यामागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतनाच अंमलबजावणीसाठी आवश्यक अवधीही पदरात पाडून घेतला. या आंदोलनाच्या निमित्ताने विरोधकांकडे आयती संधी चालून आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या खेळीने विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ सोमवारी दुपारी एक वाजता विधान भवनात दाखल झाले. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र खोलीत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये सुमारे एक तास बैठक चालली. इतका वेळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मात्र बाहेर ताटकळत उभे होते. जेव्हा या नेत्यांना बैठकीस बोलावण्यात आले तोपर्यंत मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळात समझोता झाला होता. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर काही अटींवर मोर्चा मागे घेण्याचीही तयारी शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाने मॅच आधीच फिक्स केली होती, अशी भावना विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. विरोधी नेतेच नव्हे तर ज्येष्ठ मंत्रीही बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे हा सारा मामला फिक्स होता की काय? अशी शंका घ्यायला वाव असल्याची प्रतिक्रिया विरोधी बाकांवरील ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या अँटी चेंबरमध्ये ही खलबते झाली. यात किसान सभेचे नेते अजित नवले, अशोक ढवळे, माजी आमदार आणि सीपीआयचे नेते नरसय्या आडम, शेकाप आमदार जयंत पाटील, आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आदी नेत्यांना मात्र बाहेर ताटकळत थांबावे लागले होते.तर, नाशिकपासून सुरु झालेल्या या मोर्चाने सरकारविरोधात वातावरण बनविण्यात यश मिळविले होते.या मार्चमुळे सरकारवर दबावही वाढला होता. आंदोलकांनी रस्त्यावरची लढाई जिंकली. पण, वाटाघाटीत मात्र ते पराभूत झाले, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. त्यामुळे या मार्चबद्दल विविध प्रतिक्रिया उमटल्या.राज्य सरकारच्या कर्जमाफीबद्दल विरोधकांनी वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येत्या सहा महिन्यांत वनजमिनींचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन राज्य सरकारने आंदोलकांना दिले आहे. त्यावर आंदोलकांचे समाधान झाल्याचे चित्र आहे.आम्ही आंदोलना पाठिंबा दिला असला तरी आम्ही काही आयोजक नाही. कदाचित आंदोलकांचे नेते सरकारच्या आश्वासनावर समाधानी असावेत, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस