शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

पुरोगामी महाराष्ट्रासाठी किरवलेंची हत्त्या वेदनादायी

By admin | Updated: March 7, 2017 21:58 IST

ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे

नाशिक : संशोधक, समीक्षक व कार्यकर्ता असे व्यक्तीमत्व असलेले कोल्हापूरचे डॉक़ृष्णा किरवले यांची हत्त्या ही पुरोगामी महाराष्ट्राला वेदना देणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले़ हुतात्मा स्मारकात मंगळवारी (दि़७) आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते़ कसबे यांनी सांगितले की, डॉ़किरवले हे त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनचे माझे कौटुंबिक मित्र होते़ त्यांचा अस्मितादर्श या नियतकालिकातील निष्ठेचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे़ ते एक संशोधक, समीक्षक आणि कार्यकर्ता असे त्यांचे व्यक्तीमत्त्व आंबेडकर चळवळीत अधोरेखित आहे़ साहित्य क्षेत्रातील कार्यकर्ते विचारवंत डॉ़किरवले यांच्या हत्त्येमुळे पुरोगामी आणि विवेकवादी महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली आहे़प्राग़ंगाधर अहिरे यांनी सांगितले की, डॉक़ृष्णा किरवले यांनी आंबेडकरी शाहिरीवर केलेले संशोधन मूलगामी ठरलेले आहे़ समग्र बाबुराव बागूल या त्यांच्या ग्रंथामुळे आंबेडकरी विचारविश्व मराठी वाडगमयाच्या क्षेत्रात अधोरेखित झालेले आहे़ त्यांनी दलित साहित्यातील लोकप्रवाह याची चिंतनातून मांडणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना दलित साहित्यातील विविध प्रवाहांचे आकलन होणे सोयीचे झाले आहे़ ते केवळ साहित्यिक नव्हते तर कार्यकर्ता लेखक म्हणून पुरोगामी चळवळीत सर्वदूर परिचित होतेक़वि किशोर पाठक यांनी किरवले यांच्या हत्त्येमुळे मराठी साहित्याला उर्जा देणारा एक विचारवंत हरपल्याचे सांगितले़यावेळी डॉ़शंकर बोराडे, डॉ़संजय जाधव, राजू देसले, श्रीकांत बेणी, डॉ़धीरज झाल्टे, प्रा़महादेव कांबळे, राकेश वानखेडे आदींनी आपल्या भावना प्रकट केल्या़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भुजबळ यांनी तर शोकसभेचे आयोजन अ‍ॅड़अशोक बनसोडे, चंद्रकांत गायकवाड, अ‍ॅड़अरुण दोंदे यांनी केले होते़ फोटो :- ०७पीएचएमआर ११९डॉक़ृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उपस्थित डॉ़रावसाहेब कसबे़ समवेत किशोर पाठक, गंगाधर अहिरे़