मुंबई : ग्रंथालय संचालनालयाच्या ग्रंथालय संचालकपदी किरण गंगाराम धांडोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी या पदाचा कार्यभार धांडोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमानुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याकरिता ‘ग्रंथालय संचालक’ यांना विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.
ग्रंथालय संचालकपदी किरण धांडोरे यांची नियुक्ती
By admin | Updated: June 30, 2015 03:28 IST