शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सचिन जोशी पुसणार किंगफिशर व्हिलाची ओळख

By admin | Updated: April 19, 2017 09:31 IST

गोव्यातील विजय माल्याचा आलिशान "किंगफिशर व्हिला" विकत घेणारा सचिन जोशी लवकरच या वास्तूचे नवीन नामकरण करणार आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. 19 - गोव्यातील विजय माल्याचा आलिशान  "किंगफिशर व्हिला" विकत घेणारा सचिन जोशी लवकरच या वास्तूचे नवीन नामकरण करणार आहे. स्वत: जोशीने हिंदुस्थान टाइम्सला ही माहिती दिली. तीनवेळा लिलावाचा प्रयत्न फसल्यानंतर तेलगू अभिनेता सचिन जोशीने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तब्बल 73.01 कोटी रुपयांना किंगफिशर व्हिला विकत घेतला. 
 
उत्तरगोव्यात कांदोळीतील हा किंगफिशर व्हिला तीन एकरमध्ये पसरला आहे. मी किंगफिशर व्हिलाचे नाव बदलणार आहे. पण अजून कुठलेही नाव ठरवलेले नाही असे जोशीने सांगितले. सचिन जोशी सुद्धा मद्याच्या व्यवसायात असून त्याच्या विकिंग मीडिया अँड एंटरटेन्मेंट कंपनीने खासगी व्यवहारातंर्गत व्हा व्हिला खरेदी केला आहे. 
 
काहीवर्षांपूर्वी या बंगल्यामध्ये विजय माल्याच्या पार्टया रंगायच्या. परदेशी पाहुण्यांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या पाटर्यांना हजर असायचे. या व्हिलासंबंधी माहिती देताना सचिन जोशी म्हणाला की, मी तरुणपणी एकदा या बंगल्यामध्ये आलो होते. त्यावेळीच मी या बंगल्याच्या प्रेमात पडलो. आपले घर असावे तर असेच असे त्यावेळी मी मनाशी ठरवले होते. पुढे नशिबाने मला संधी मिळाली आणि आज हे घर मी विकत घेतले. 
 
सचिन स्वत: या बंगल्यामध्ये कुटुंबियांसोबत राहण्यासाठी येणार आहे तसेच आवश्यकतेनुसार बंगल्यात बदलही करणार असल्याचे त्याने सांगितले. भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याला काल लंडनमध्ये अटक झाली होती. मात्र काही तासातच  लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.