शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

माल्याच्या अटकेकडे किंगफिशर कर्मचाऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 03:15 IST

हजारो कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज बुडवून रातोरात लंडनला पळून गेल्याने चर्चेत आलेल्या मद्यसम्राट आणि किंगफिशर एअर लाईन्सचे मालक विजय माल्याच्या मंगळवारी लंडनमधील अटक

मुंबई : हजारो कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज बुडवून रातोरात लंडनला पळून गेल्याने चर्चेत आलेल्या मद्यसम्राट आणि किंगफिशर एअर लाईन्सचे मालक विजय माल्याच्या मंगळवारी लंडनमधील अटक आणि जामिनावर सुटकेच्या काही तासांच्या नाट्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यामुळे बेरोजगार झालेल्या किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच आपले थकविलेले वेतन मिळणार की नाही, अशी भीती त्यांना सतावत आहे. मुळचा बंगळूरचा असलेला विजय माल्या याची मुंबईसह देश आणि विदेशात कोट्यवधीची मालमत्ता आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात त्याचे १०३.५ कोटींचे किंगफिशर हाऊस आहे. तर गोव्यातही ७३ कोटींचा किंगफिशर विला आहे. माल्याने २००३ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सची स्थापना करून आपल्या लाडक्या पुत्राला म्हणजे सिद्धार्थला भेट दिली होती. या कंपनीचे कार्यालय मुंबईत असून यामुळे अनेकांना बेरोजगार मिळाला होता. मात्र, माल्याने विविध बँकामधून कर्ज घेत ते न फेडल्यामुळे २०१२ पासून तो चर्चेत आला. त्यात किंगफिशर एअरलाईन बंद पडल्याने अनेक कामगार बेरोजगार झाले. त्यांना कामावरुन काढून टाकल्यामुळे विमानतळाबाहेर निदर्शने करण्यात आली होती. कर्ज बुडवेगिरी करत विजय मल्ल्याने स्टेट बँक आॅफ इंडिया आणि इतर सहकारी अशा एकूण १७ बँकाचे जवळपास ९००० कोटी रुपये बुडवत २०१६ साली ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही न देता पळ काढल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)माल्याला भारतात आणणार...माल्याविरोधात भारतीय तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहे. त्यामुळेच त्याला आज अटक झाली आहे. या पुराव्यांच्या आधारेच लवकरच त्याला भारतातही आणले जाईल. याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे ईडीचे वकील अ‍ॅड. हितेन वेडेगावकर यांनी सांगितले.