शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किंगफिशर एअरलाईन्सला ग्राहक मंचाचा दणका

By admin | Updated: May 8, 2014 22:34 IST

एका व्यावसायिकाला विमान सेवा पुरविण्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी धरत ग्राहक मंचाने किंगफिशर एअरलाईन्सने व्यावसायिकाला मानसिक त्रासापोटी २० हजार १४७ रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

पुणे : एका व्यावसायिकाला विमान सेवा पुरविण्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी धरत ग्राहक मंचाने किंगफिशर एअरलाईन्सने व्यावसायिकाला मानसिक त्रासापोटी २० हजार १४७ रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.नयन ज्योती बर्मन (रा. खडकी बायपास रस्ता, खडकी) हे आपल्या कुटुंबासोबत पुण्याहून ते गुवाहाटीला जाणार होते. यासाठी त्यांनी किंगफिशर एअरलाईन्सच्या कोरेगाव पार्क येथील शाखेतून ३ तिकीटे आरक्षित केली होती. यासाठी त्यांनी १० हजार १४७ रूपये भरले होते. मात्र, किंगफिशर एअरलाईन्सच्या अंतर्गत असुविधेमुळे ही तिकिटे रद्द झाली. त्यामुळे बर्मन यांनी त्यांच्या तिकीटांचे रूपये पुन्हा रिफंड करण्याची विनंती कंपनीकडे केली. एअरलाईन्स कंपनीने सुरूवातील रिफंड करण्याची तयारी दाखविली मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांनी पैसे परत दिले नाही. त्यामुळे बर्मन यांनी २६ डिसेंबर २०१३ रोजी ग्राहकमंचाकडे तक्रार केली. बर्मन यांनी यासंदर्भात कागदोपत्री पुरावे सादर केले. तिकीटाची प्रत, रद्द केलेल्या तिकीटांची प्रत त्यांनी मंचाकडे सादर केली. कंपनीने मात्र सेवेत काहीही कसूर राहिली नाही असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सादर केला नाही. यामुळे ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य गीता घाडगे यांनी पुराव्यांचे अवलोकन केले व कंपनीने योग्य पद्धतीने सेवा दिलेली नाही, त्यात कसूर ठेवल्याचे मान्य केले. बर्मन हे त्यांच्या तिकटीचे १० हजर १४७ रूपये परत मिळण्यास पात्र आहेत तसेच त्यांना मानसिक शाररिक झालेल्या त्रासासाठी कंपनीने १० हजार रूपये देण्याचेही आदेशात नमूद केले. एकूण २०हजार १४७ रूपये ६ आठवड्यात परत करावे आणि तसे न केल्यास तक्रार दाखल झाल्यापासून ९ टक्के व्याजाने ही रक्कम परत करावी लागेल असे ही आदेशात नमूद करण्यात आले.