शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘लालबागचा राजा’चरणी सोन्याची पाऊले!

By admin | Updated: September 19, 2016 01:43 IST

‘लालबागचा राजा’चरणी अर्पण होणाऱ्या सोने, चांदी आणि अन्य वस्तूंच्या जाहीर लिलावास सोमवारी, १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

मुंबई : ‘लालबागचा राजा’चरणी अर्पण होणाऱ्या सोने, चांदी आणि अन्य वस्तूंच्या जाहीर लिलावास सोमवारी, १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका भाविकाने अर्पण केलेली १ किलो १६२ ग्रॅम वजनाची सोन्याची पाऊले, यंदाच्या लिलावातील विशेष आकर्षण असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार महेश जाधव यांनी दिली. तर या सोन्याच्या पाऊलांची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३६ लाख रुपये आहे, असे सुवर्णकार संजय (नाना) वेदक यांनी सांगितले.मंडळाचे खजिनदार महेश जाधव म्हणाले की, सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लिलाव सुरू राहील. सलग तीन दिवस चालणाऱ्या लिलावात एकूण १७५ सोन्या-चांदीच्या वस्तूंची बोली लावली जाईल. गणेशोत्सवात एकूण ५,००९.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे, तर ७९,६०३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने राजाच्या चरणी अर्पण झाले आहेत. जो भाविक जास्त बोली लावेल, त्याला ती वस्तू विकत घेता येईल.दागिन्यांव्यतिरिक्त ‘राजा’च्या स्टेजजवळील आणि रांगेतील दानपेट्यांमधील रोख रक्कम मोजण्याचे काम रोजच्या-रोज सुरू होते. बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने दानपेट्यांमधील नोटा, चिल्लर आणि हारस्वरूपातील नोटा मोजण्याचे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजनजीकच्या दानपेट्यांमधून २ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत. तर रांगेतील दानपेट्यांमध्ये ३ कोटी ५३ लाख १० हजार रुपयांचे दान जमा झाले आहे. गुरुवारी विसर्जनादरम्यान ठेवलेल्या पेटीमध्ये ८ लाख ७५ हजारांचे दान मिळाल्याची माहिती मंडळाने दिली.>काय काय मिळणार लिलावात?‘राजा’च्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या पाऊलांव्यतिरिक्त सोन्याचे घर, पाळणा, उंदीर अशा विविध वस्तूंचे आकर्षण लिलावात पाहायला मिळेल. अडीच किलो वजनाचा चांदीचा कलश हे आणखी एक आकर्षण लिलावात खरेदी करता येईल. बाजारभावानुसार या कलशाची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये आहे, अशी माहिती संजय (नाना) वेदक यांनी दिली. याशिवाय सोन्या-चांदीची चैन, अंगठी, मोदक, हार, बिस्किटे, नाणी अशा विविध वस्तूंचा लिलावही या वेळी करण्यात येईल.>२ बाइक, २ स्कूटर्सही अर्पण‘राजा’च्या चरणी सोन्या-चांदीच्या वस्तूंव्यतिरिक्त काही भाविकांनी २ बाइक आणि २ स्कूटर दान केल्याचे मंडळाने सांगितले. यामधील एका बाइकचा लिलाव सोमवारी, तर उरलेल्या वाहनांचा लिलाव नंतर करणार असल्याचे मंडळाने सांगितले.