ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चेन्नईतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. एकीएकडे येथील नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी इतकी वर्षे महाराष्ट्राच्या भूमीत राहून बॉलीवूडच्या माध्यमातून कोट्यावधींची कमाई करणा-या शाहरुख खानला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मात्र आठवला नाहीत.
रेड चिलीज एन्टरटेन्मेंट आणि ‘दिलवाले’ टीमच्या वतीने शाहरुखानने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री साहायत्ता निधीत एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. चेन्नईला पुराचा तडाखा बसल्यानंतर सर्वस्तारातून चेन्नईला मदत करण्याचा ओघ सुरु झाला. पूरग्रस्तांसाठी अनेक कलाकार आणि खेळांडूनीही मदत केली. मात्र, पाकिस्तानातील पूरग्रस्तांना मदत करणा-या शाहरुखकडून चेन्नईबाबत कोणतीच घोषणा झाली नव्हती. यावर सोशल मिडीयात शाहरुखवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच, त्याच्या आगामी चित्रपट दिलवालेवर बहिष्कार टाकण्याच्या चर्चा ऊत आले होते, त्यामुळे शाहरुखने ही मदत केल्याची शक्यता वर्तविण्यात येते. मात्र महाराष्ट्र दुष्काळाचे संकट ओढावले असता अनेक शेतक-यांनी कर्जबारीमुऴे आत्महत्या केल्या. यावेळी शाहरुखला एकाही दुष्काळग्रस्ताची किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाची हाक का ऐकू आली नाही, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार धावून आला. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी ९० लाखांची मदत केली. तसेच, याआधी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आणि त्या दोघांनी 'नाम' फाउंडेशनच्यामार्फत दुष्काऴग्रस्तांना मदत केली.