शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये दलित कुटुंबाची हत्या

By admin | Updated: October 22, 2014 14:26 IST

जवखेडे खालसा येथे दलित कुटंबातील तिघांचा हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून घराजवळील एका विहिरीत फेकून देण्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ सं

पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे खालसा येथे दलित कुटंबातील तिघांचा हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून घराजवळील एका विहिरीत फेकून देण्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) तर सुनील संजय जाधव (१९) अशी मृतांची नावे आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जाधववस्ती जवळील शेतात हे कुटुंब रहात असून, मोलमजुरी तसेच गवंडी काम करीत होते. जाधव वस्तीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्यांचे शेत आहे. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून धारदार शस्त्रांनी माय, बाप व लेकाचा खून करुन मृतदेह जवळच असलेल्या पडक्या विहिरीत तुकडे तुकडे करून टाकले. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरासमोर बांधलेली शेळी ओरडत असल्याचा आवाज त्यांच्या शेजारीच असलेल्या नातेवाईकांना आला. शेळी का ओरडते हे पाहण्यासाठी ते गेले असता घर उघडे दिसले तसेच कपडे अंथरलेले दिसले. हे तिघे जण दवाखान्यात गेले असतील, त्यामुळे त्यांनी तिसगाव, शेवगाव व नगर येथील दवाखाने  पाहिले. त्यानंतर नातेवाईक दुपारी परत गावात आले. नातेवाईकांनी विहिरीत डोकावले असता मृतदेह विहिरीत तरंगताना दिसले. त्यांनी ही माहिती पोलीस व ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार घटनास्थळी पोहोचले. नगरहून धडक कृती दलाच्या जवानांचे पथक दाखल झाले. रात्री जिल्हा पोलीसप्रमुख लखमी गौतम यांनी घटनास्थळाला भेट देवून माहिती घेतली. रात्री उशिरा श्वानपथक घटनास्थळी आले होते. रात्री नऊ वाजता जवानांच्या पथकाने एक जणाचा मृतदेह बाहेर काढला. मृत कुटुंबाची मोटारसायकल घटनास्थळापासून २ किलोमीटर अंतरावरील जांभूळदेव शिवारात आढळून आली. (प्रतिनिधी)