शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हत्या बंगल्याच्या व्यवहारातून

By admin | Updated: March 5, 2017 00:48 IST

ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मायलेकास शनिवारी अटक केली.

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मायलेकास शनिवारी अटक केली. संशयित प्रीतम गणपती पाटील (वय ३०, रा. राजेंद्रनगर), त्याची आई मंगला गणपती पाटील (५५) अशी त्यांची नावे आहेत. बंगल्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून डॉ. किरवले यांची हत्या केल्याची कबुली प्रीतम पाटील याने दिली आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेला एडका (एक घातक शस्त्र) व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ‘‘डॉ. किरवले आणि माझ्या वडिलांचे मैत्रीसंबंध असल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांना बंगला दुसऱ्या कोणाला विकू नका, आम्हीच घेतो असे सांगितले. बाजारभावाप्रमाणे बंगल्याची किंमत ४६ लाख रुपये ठरली. मी नातेवाईक, मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन २६ लाख रुपये किरवले यांना दिले. उर्वरित २० लाख रुपये रजिस्ट्रेशन करताना द्यायचे ठरले. शुक्रवारी (दि. ३) दुपारी दस्त नोंदणी कार्यालयात मी, वडील व डॉ. किरवले असे तिघेजण गेलो. बंगल्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे संचकारपत्र केले. त्यानंतर तीनच्या सुमारास आम्ही घरी आलो. किरवले यांनी मला व वडिलांना पुन्हा चारच्या सुमारास घरी बोलावून घेतले. त्यांनी ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त रकमेची मागणी केली. यावरून आमच्यात शाब्दिक वादावादी झाली. वडील शेजारी परीट यांच्या घरी सुतारकाम असल्याने निघून गेले. त्यानंतर मी किरवले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पैसे वाढवून दिल्याशिवाय रजिस्ट्रेशन करणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझा राग अनावर होऊन मी त्यांची हत्या करुन तेथून मी पसार झालो’’, असा कबुलीजबाब प्रीतम पाटील याने दिला आहे. डॉ. किरवले यांच्या हत्ये प्रकरणी संशयित प्रीतम पाटील व त्याची आई मंगला पाटील या दोघांना अटक केली आहे. त्याच्या वडिलांचा सहभाग आढळून आल्यास त्यांनाही आरोपी केले जाईल. आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. असे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी सांििगतले. (प्रतिनिधी)पार्थिवावर अंत्यसंस्कार- आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. - शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत त्यांची पत्नी कल्पना, मुलगी अनघा यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह साहित्यिक, आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाबांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या हत्येमागे व्यक्तिगत कारण नक्कीच नाही. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी मुलगी अनघाने केली.