शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला धमकावणारा खाटीक गजाआड

By admin | Updated: August 8, 2015 01:47 IST

गँगस्टर छोटा शकीलच्या नावे पश्चिम उपनगरातील एका बडया बिल्डरला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या अहमद आदम शेख या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी

मुंबई : गँगस्टर छोटा शकीलच्या नावे पश्चिम उपनगरातील एका बडया बिल्डरला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या अहमद आदम शेख या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. शेख हा खाटीक असून तो स्पूफ कॉल करून बिल्डरला धमकावत होता. शेख आणि त्याच्या बेरोजगार मित्राने आधी बिल्डरची इत्यंभूत माहिती काढली. त्यानंतर त्याला शकीलच्या आॅफिसमधून वसीम बोलतोय असे सांगून पाच कोटींच्या खंडणीसाठी धमक्या देण्यास सुरूवात केली. बिल्डरच्या एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर शेख धमकीचे फोन करत होता. विशेष म्हणजे फोन केल्यानंतर कर्मचाऱ्याला फोन करणाऱ्याच्या नंबरऐवजी स्वत:चाच नंबर दिसत होता. यामुळे बिल्डर आणखी घाबरला. त्याने तातडीने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच खंडणीविरोधी पथकाकडेही अर्ज सादर केला. वरिष्ठ निरिक्षक विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संपूर्ण पथक या गुन्हयाची उकल करण्यासाठी धडपडू लागले. स्पूफ कॉलींगमुळे सुरूवातीला पथकाच्या हाती काही लागत नव्हते. मात्र पथकाने अथक परिश्रम करून शेख व त्याच्या साथीदाराची ओळख पटवली. त्यापैकी शेख याला अटक करण्यात आली. तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.स्पूफ कॉलींगची शाळा फरार आरोपीने शेखला शिकवली होती. बिल्डरला फोन करण्याआधी धमकीचे संवाद काय असावेत हे फरार आरोपी शेखला लिहून देई. तसेच हे संवाद कोणत्या अंदाजात फेकायचे तेही समजावून सांगे, अशी माहिती शेखने चौकशीत पोलिसांना दिल्याचे समजते. शेखची गुन्हेगारी पार्श्वभुमी पोलीस पडताळून पाहात आहेत. दरम्यान न्यायालयाने त्याला १० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. (प्रतिनिधी)