शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भावानेच घेतली खुनाची सुपारी

By admin | Updated: July 12, 2014 23:56 IST

डुकरे चोरल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या रविवारी रात्री सिंहगड रस्त्यावर घडली होती.

पुणो : डुकरे चोरल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या रविवारी रात्री सिंहगड रस्त्यावर घडली होती. हा खून कुणी बाहेरच्याने नाही, तर लहान भावानेच केल्याचे उघडकीस आले असून, मोठय़ा मुलाच्या खुनाची सुपारी लहान भावाला खुद्द वडिलांनीच दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वडिलांसह दोन भावांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी दिली. 
बाप्पू अशोक माने (वय 27, रा. शांती कॉर्नरसमोर, आनंदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वडील अशोक बबन जाधव (वय 57, रा. आनंदनगर), भाऊ किरण ऊर्फ चिंग्या अशोक माने (वय 24), लाल्या ऊर्फ बंडू अशोक माने (वय 22) यांना अटक करण्यात आली आहे. अशोक यांना तीन मुले असून, यातील लाल्या याला त्याच्या मावशीने दत्तक घेतलेले आहे. तो सासवड येथे मावशीकडेच राहतो. 
 गेल्या रविवारी रात्री बाप्पू याचा खून झाला होता. बाबा जाधव नावाच्या तरुणाने बाप्पूला उचलून नेल्याचे, तसेच त्यांनीच मारहाण करून खून केल्याची फिर्याद त्याच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांच्या कामावर आक्षेप घेत त्याच्या वडिलांनी आयुक्तालयात पोलिसांविरुद्ध तक्रारही केली. दरम्यान, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त जयवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांनी कुटुंबीयांच्या मोबाईलचे डिटेल्स काढले.  मोबाईलमधील क्रमांकानुसार एकेकाला चौकशीला बोलावण्यात आले. या चौकशीमध्ये वडिलांनीच स्वत:च्या खुनाचा कट आखल्याचे समोर आल्यावर पोलीस अवाक झाले. तातडीने पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून किरण आणि लाल्या याला ताब्यात घेण्यात आले. बाप्पूला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दुस:यांची डुकरे चोरायचा. यावरून भांडणो होत असत. चिंग्याला त्यामुळे अनेकदा मार खावा लागला. याचा राग वडिलांच्या मनात होता.  वडिलांनी लाल्या याला बोलावून घेऊन सासवडच्या तरुणांकडून बाप्पूला मारण्याविषयी सूचना दिल्या. सुरुवातीला लाल्याने याला हरकत घेतली, पण वडिलांच्या आग्रहाखातर त्याने सासवडचे तरुण मित्र गोळा करून 6 जुलैला रात्री बाप्पूला घरासमोरून गाडीमध्ये नेऊन त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर आई व भावांनी त्याला दवाखान्यात न नेता रात्री साडेदहाच्या सुमारास घरी आणले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 
(प्रतिनिधी)
 
4खुनाचा तपास करीत असताना पोलिसांनी बाबा जाधवला अटक केली खरी, परंतु कुटुंबीयांचे वागणो संशयास्पद वाटू लागल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमधून आरोपी सुटू शकले नाहीत. या प्रकरणात आईलाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव, सहायक निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस हवालदार रघुनाथ जाधव, संतोष सावंत, सचिन ढवळे, कुदळे, सुतार, गवळी, जमदाडे, मोहिते यांच्या पथकाने केली.