शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

किडनी तस्करीचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत!

By admin | Updated: December 5, 2015 00:37 IST

किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याचे संशयित आरोपींच्या चौकशीतून उजेडात आले.

अकोला : किडनी तस्करी प्रकरणाचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत पोहोचले आहेत. तेथील एका हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याचे संशयित आरोपींच्या चौकशीतून उजेडात आले. या प्रकरणी आणखी तपासासाठी दोन पथके नागपूर व सांगली येथेसुद्धा गेली आहेत. शिवाजीनगरात राहणारे संतोष शंकर गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आनंद भगवान जाधवकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. पैसे देणे शक्य होत नसल्याने जाधवने त्यांना किडनी देण्यास प्रवृत्त केले. जाधवने त्यांची भेट हरिहरपेठ येथील रहिवासी देवेंद्र श्रीधर शिरसाटशी घालून दिली. श्रीधरने गवळींना नागपूर येथील एका रुग्णालयात नेले.या ठिकाणी सर्व तपासण्या करून तेथील एका मध्यस्थामार्फत किडनीच्या खरेदीदाराशी संपर्क केला आणि श्रीलंकेत कोलंबो येथील नवलोक रुग्णालयात ३ आॅक्टोबर २०१५ रोजी गवळींवर शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली. गवळींनी किडनी तस्करीचा भंडाफोड केल्यावर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आनंद भगवान जाधव (३0) आणि देवेंद्र श्रीधर शिरसाट (४0) यांना अटक केली. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलचे नाव समोर आले आणि या हॉस्पिटलमध्ये पाच जणांच्या किडनी काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

डॉक्टर दाम्पत्याचा नागपूरमध्ये शोधनागपुरात स्थायिक झालेले यवतमाळ येथील डॉक्टर श्रोत्री दाम्पत्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने नागपूरकडे मोर्चा वळविला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.संशयित शिवाजी कोळी पसार!स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची दोन पथके नागपूर आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरकडे गेली आहेत. तेथील शिक्षक शिवाजी कोळी याचेही नाव या प्रकरणी समोर आल्याने, पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी इस्लामपूरला गेले आहेत. परंतु, त्यापूर्वी कोळी तेथून पसार झाला. पोलिसांची तीन पथके नागपूर, सांगली आणि औरंगाबाद येथे तपासासाठी गेली आहेत. पथके परतल्यानंतरच अधिक माहिती समोर येईल. - चंद्रकिशोर मीणा,पोलीस अधीक्षक, अकोलाऔरंगाबादला काढल्या किडनीशांताबाई रामदास खरात, देवानंद कोमलकर, अमर शिरसाट, संतोष कोल्हटकर यांसह आणखी एकाची किडनी औरंगाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली.