शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

किडनी तस्कर श्रीलंकेत!

By admin | Updated: December 3, 2015 01:04 IST

येथील बहुचर्चित किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंत पोहोचल्याची माहिती बुधवारी समोर आली. किडनी प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रियाच श्रीलंकेत केली जात असल्याचे

- सचिन राऊत,  अकोलायेथील बहुचर्चित किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंत पोहोचल्याची माहिती बुधवारी समोर आली. किडनी प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रियाच श्रीलंकेत केली जात असल्याचे या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केल्यानंतर उघड झाले आहे.गरजू, गरिबांना हेरायचे. त्यांना आधी व्याजाने पैसे द्यायचे. त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारून थकबाकीची रक्कम फुगवायची. एकदा का सावज पूर्णत: अडकले की, पैशांसाठी त्याला जीवे मारण्याची धमकी देणे, कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याची भीती दाखविणे, असे प्रकार किडनी तस्करांकडून केले जातात. कर्ज दिलेली व्यक्ती अडचणीत आल्यानंतर त्याला आणखी ३ ते ४ लाख रुपयांचे आमिष दाखवून त्याला किडनी काढण्यासाठी भाग पाडण्याचे कारस्थान हे रॅकेट करते. कोलंबोमधील डॉक्टरांशी संपर्क साधून किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते. डॉक्टरांची तारीख निश्चित झाली की, नागपूरमधील एका डॉक्टरकडे रूग्णाच्या सर्व तपासण्या केल्या जातात. तपासण्या झाल्यानंतर लाभार्थी व्यक्ती पैसे देते. त्यानंतर नागपूर येथेच तत्काळ पासपोर्ट काढून रूग्णाला श्रीलंकेत नेण्यात येते. तेथील नवलोक हॉस्पिटलमध्ये रूग्णाची किडनी काढली जाते. अशाच प्रकारातून जन्या शहरातील किडनी काढलेल्या दोघांनी उपरोक्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली आहे. अकोल्यातील किडनी तस्करीचे हे रॅकेट केवळ भारतातच नसून आणखी काही देशांमध्ये त्याचे धागेदोरे असल्याचे तपासात समोर आले आहे. श्रीलंका हे या किडनी तस्करांचे मुख्यालय असून, हे मुख्यालय नागपुरातील एका डॉक्टरच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे समोर आले आहे.पासपोर्ट जप्तदेवेंद्र शिरसाट व आनंद जाधव यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी संतोष गवळी व संतोष कोल्हटकर नामक दोघांच्या किडन्या काढल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी देवेंद्रच्या घरातून तीन पासपोर्ट जप्त केले आहेत. त्यातील संतोष गवळी व संतोष कोल्हटकरच्या पासपोर्टवरून ते श्रीलंकेत जाऊन आल्याचे व त्यांची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे, आंध्र प्रदेश कनेक्शन : किडनी काढणाऱ्याच्या नागपूर तसेच पुणे व आंध्र प्रदेशमध्येही तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती उजेडात आली आहे. पीडितांची संख्या वाढणार : अकोल्याप्रमाणेच मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, नागपूर, इस्लामपूर येथील काही पीडित असल्याची माहिती आहे.