शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयातील विधिज्ञानेही केली होती किडनी खरेदी!

By admin | Updated: December 11, 2015 09:06 IST

आरोपींनी केली किडनी खरेदी करणा-यांची नावे उघड.

अकोला: किडनी तस्करी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी किडनी खरेदी करणार्‍या रुग्णांची नावे गुरुवारी उघड केली. यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका विधिज्ञाचाही समावेश आहे. किडनी तस्करी प्रकरणामध्ये पोलिसांनी सूत्रधार शिवाजी कोळी, विनोद पवार यांच्यासह त्यांचे साथीदार देवेंद्र सिरसाट, आनंद जाधव यांना अटक केली. पोलीस आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. चौकशीदरम्यान दररोज किडनी तस्करीसंबंधी खळबळजनक माहिती समोर येत आहे. आरोपींच्या चौकशीतून त्यांनी शांताबाई खरात हिची किडनी नांदुर्‍यातील विजया झांबड यांना, देवानंद कोमलकर यांची किडनी नंदुरबार येथील शिक्षक नाईक यांना, संतोष कोल्हटकर यांची किडनी यवतमाळ येथील डॉ. मंगला श्रोत्री यांना, संतोष गवळी यांची किडनी नागपुरातील शर्मा यांना, तर आनंद जाधव याची किडनी विनोद पवारला आणि अमर सिरसाट यांची किडनी नागपुरातील उच्च न्यायालयातील एका विधिज्ञाच्या शरीरामध्ये प्रत्यारोपित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील एक किडनी श्रीलंकेतील कोलंबो येथील इस्पितळामध्ये, तर उर्वरित पाच किडन्यांचे प्रत्यारोपण औरंगाबादेतील इस्पितळामध्ये करण्यात आले.

*नागपूरच्या इस्पितळातील कागदपत्रांची तपासणी

        किडनी तस्करी प्रकरणातील सूत्रधार शिवाजी कोळी याला घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक नागपूर येथे एका इस्पितळात गेले आहे. तेथे इस्पितळातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पोलीस पथक तपासणी करीत आहे. शिवाजी कोळी हा किडनी विक्रीसाठी तयार झालेल्या व्यक्तींना नागपूर येथील एका इस्पितळात तपासणीसाठी घेऊन जात होता. पोलिसांनी यापूर्वी नागपुरातील दोन डॉक्टरांना अकोल्यात बोलावून त्यांची चौकशी करून जबाब नोंदविले होते.