ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 16 - अनेक आंदोलने मोर्चे काढून सुध्दा अपंगांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व अपंगाचे पुनर्वसन करण्यासाठी येथील अपंग महिला मिना नामदेव डोंगरदिवे यांनी १५ आॅगस्ट पासून किडनी विक्रीसाठी काढली आहे.मिना नामदेव डोंगरदिवे पती नामदेव डोंगरदिवे व इतर बुलडाणा जिल्ह्यातील अपंगांनी जिल्ह्यातील अपंगाचे सर्वोतोपरी पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने गेल्या १५ वर्षात मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे मोर्चे, उपोषण, घंटानांद, थाळीनांद, डफडे नांद, लोटांगण, आत्मदहनाचे इशारे अशा अनेक प्रकारचे आंदोलन केली. पण अपंगाचे नौकरी, व्यवसायासाठी जागा, घरकुल, दारिद्रय रेषेचे कार्ड, निराधाराना सवलत, अपंग व त्यांच्या मुलांना शिक्षण, प्रशिक्षण, उदरनिर्वाहासाठी शेती व इतर बाबतीत पुनर्वसन होऊ शकलेच नाही.आज जिल्ह्यात एक लाखाच्या वर अपंगांची लोकसंख्या आहे असे असतांना १० टक्के अपंगाचे सुध्दा आर्थिक बाबतीत सबळीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे अपंगांना लग्नाद्वारे स्वत:चा जोडीदार शोधणे कठीण झाले आहे. ज्या अपंगांचे लग्न झाले असेल व तो शासनाच्या वरील सोयी सवलती न मिळाल्यामुळे आर्थिक बाबतीत दुर्लक्षीत राहिला असेल तर मुलींचे शिक्षण, आई, वडील व पत्नी यांच्या आरोग्याविषयक आर्थिक बाबतीत दुर्लक्षीत राहिला असेल तर मुलांचे शिक्षण, आई वडील व पत्नी यांच्या आरोग्यविष्ज्ञयक तसेच अन्न, वस्त्र, निवारा व इतर समस्या सोडवू शकत नाही. त्यामुळे अपंग हातबल झालेला आहे अशा वैतागलेल्या परिस्थितीत अपंगांना जगावे की मरावे कळत नाही. देशात १९९५ च्या अपंगाचे सर्वोतोपरी पुनर्वसनाच्या कायद्याअगोदर व नंतर मोठ्या प्रमाणात कायदे करण्यात आले. मात्र अंमलबजावणी न झाल्यामुळे अपंगाचे पुनर्वसन होऊ शकले नाही. मी गेल्रूा १० ते १५ वर्षापासून मला स्वत:ला लेडीज गारमेट हा व्यवसाय करण्यासाठी जागा मिळावी, या विषयालाअनुसरुन अनेक वेळेस शासन प्रशासनाकडे निवेदन दिले. पण त्यावर काहीच निर्णय झाला नाही. अपंगाच्या आर्थिक सबळीकरणाबाबत शासन प्रशासनाची सकारात्मक भूमिका दिसली नाही. त्यामुळे १० दिवसाअगोदर जिल्हाधिकारी यांनाकिडनी विकण्याची परवानगी मागितली. जिल्हाधिकारी यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे १५ आॅगस्ट रोजी स्वत:ची किडनी विकण्यास बसले आहे असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
अपंग महिलेने काढली किडनी विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2016 19:25 IST