वडगाव गड(बुलडाणा), दि. २७- वडगाव गड गट ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या ग्राम इस्लामपुरात जकाउल्ला खान अब्दुल्ला खान (वय ४३) या तरुणाचा दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर तरुण अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असून, तरूणाच्या नातेवाइकांनी त्याच्या उपचारार्थ मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च करण्याची ऐपत नसताना अकोला, खामगाव येथील खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार केले, तरीही किडनी आजाराने सदर तरुणाचा मृत्यू झाला. इस्लामपुरात जेमतेम १00 घरांची वस्ती असून, गावातील नागरिक विहिरीचे व हातपंपाचे पाणी पित असल्यामुळे तसेच सदर पाण्यात प्रचंड प्रमाणात क्षार असल्यामुळे मागील एक-दीड वर्षात जवळपास आठ ते दहा नागरिकांचा किडनी आजाराने मृत्यू झाला असून, आजही काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, प्रशासन सदर गावात नागरिकांच्या आरोग्याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना तत्काळ कराव्या व क्षारयुक्त पाण्यापासून नागरिकांची मुक्तता करावी, अशी ग्रामवासीयांची मागणी होत आहे.
इस्लामपुरात किडनी आजाराने तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: February 28, 2017 01:49 IST