शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पळालेल्या कैद्याने केले विद्यार्थिनीचे अपहरण

By admin | Updated: September 19, 2014 00:57 IST

मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी दुपारी फरार झालेला कुख्यात कैदी सूरज श्याम अरखेल (वय ३३) याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

कुख्यात सूरजचा शोध : कारागृहातून कसा पळाला ?नागपूर : मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी दुपारी फरार झालेला कुख्यात कैदी सूरज श्याम अरखेल (वय ३३) याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. अपहृत मुलीला घेऊन सूरज अरखेल पळून गेल्याची सूत्रांची माहिती आहे.सूरज हत्येच्या आरोपात १४ वर्षांपासून कारागृहात बंदिस्त होता. त्याचे बहुतांश कैद्यांसोबत आणि बहुतांश अधिकाऱ्यांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध होते. ‘साहेबांचा खास माणूस‘ म्हणून सूरज कारागृहात ओळखला जात होता. तो कैद्यांना मोबाईल आणि सीमकार्ड पुरवायचा. प्रत्येक कैद्याकडून त्या बदल्यात तो दोन हजार रुपये वसूल करीत होता. ही रक्कम कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे पोहचवली जायची, अशीही खास सूत्रांची माहिती आहे. एक प्रकारे कारागृहात चालता बोलता ‘पीसीओ‘ चालवणारा सूरज एका कच्च्या कैद्याच्या माध्यमातून मोहननगर (सदर) येथील एका कुटुंबांचा ‘फोनोफ्रेंड’ झाला. याच कुटुंबातील १७ वर्षाच्या कृती (नावात बदल केला आहे) हिच्यासोबत त्याचा वारंवार संपर्क आला. परिणामी तो मोबाईलच्या वसुलीतील काही रक्कम लपवू लागला. सूरजवर खास मेहरबानी असल्यामुळे त्याला खुल्या कारागृहात पाठविण्यात आले होते. अर्थात सूरज कारागृहाच्या बाहेर जात येत होता. त्यामुळे तो बाहेरच्या बाहेर पैसे लपवू लागला. खास सूत्रांच्या माहितीनुसार, सूरजने ‘पीसीओ‘च्या (मोबाईल) माध्यमातून वसूल झालेली मोठी रक्कम एका अधिकाऱ्याकडे पोहचवली नाही, त्यामुळे मंगळवारी ‘त्या‘ अधिकाऱ्याच्या आदेशाने सूरजची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्याकडून मोबाईल आणि अनेक सीमकार्डही हिसकावून घेण्यात आले. तसेच त्याची बेदम धुलाईसुद्धा करण्यात आली. या प्रकारामुळे सूरज चिडला. तो नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी कारागृहाबाहेर आला आणि त्याने बाहेरचा रस्ता धरला. कारागृहातून पळून गेल्यानंतर त्याने कृतीला विशिष्ट ठिकाणी बोलवून घेतले. नियमित संपर्कामुळे हे दोघे (कृती आणि सूरज) एकमेकांवर फोनच्या माध्यमातूनच प्रेम करीत होते. त्यामुळे बुधवारी दुपारी सूरजने फोन करताच कृती विशिष्ट ठिकाणी गेली. तेथून हे दोघेही पळून गेले. (प्रतिनिधी)कृतीला लग्नाचे आमिष कृतीला सूरजने यापूर्वीच लग्नाचे आमिष दाखवले होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे अल्पवयीन कृती सूरजच्या जाळ्यात अडकली अन् त्याच्यासोबत पळून गेली. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे कृतीच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला. तिच्या आईने सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्रशासन हादरलेकारागृहातून पळून गेलेल्या कुख्यात सूरजने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची माहिती कानावर आल्यामुळे अवघ्या प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूरज आणि कृतीचा शोध घेतला जात आहे. अपहृत कृती महाविद्यालयीन (बीए -१) ची विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे तर, सूरज एक खतरनाक गुन्हेगार आहे. त्याचा मध्यवर्ती कारागृहात ठिकठिकाणच्या गुन्हेगारांसोबत संपर्क आला आहे. त्यामुळे त्याच्याकडून आणि त्याच्या साथीदारांकडून कृतीच्या जीवाचे काही बरेवाईट केले जाऊ शकते,अशी शंका आहे. यामुळेच त्यात सूरज कारागृहातील अधिकाऱ्यांच्या पापाचा पाढा जाहीरपणे वाचू शकतो, याचीही संबंधितांना कल्पना आहे. त्यामुळे पोलिसांसोबतच कारागृहातील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.