शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्ता राहुल शेंडे कुख्यात

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

पवन गणपत ढगे या बालकाचे अपहरण करणारा राहुल अरुण शेंडे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वी दोन मुलांच्या अपहरणासह इतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वर्धा पोलिसांनी दिली.

पाच गंभीर गुन्हे उघड : विविध गुन्ह्यात ‘वॉन्टेड’, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यतावर्धा : पवन गणपत ढगे या बालकाचे अपहरण करणारा राहुल अरुण शेंडे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वी दोन मुलांच्या अपहरणासह इतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वर्धा पोलिसांनी दिली. राज्यातील विविध भागातील पोलिसांना तो हवा आहे. वर्धा पोलीस बुधवारी सकाळी पवनसह त्याला घेऊन वर्धेत दाखल झाले. यानंतर पवनला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. माय-लेकाच्या भेटीने वातावरण भारावले होते. पवनच्या अपहरणप्रकरणी राहुल शेंडेविरुद्ध कलम ३६३, ३६४ अ,३८५ व ३८६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरणकर्ता राहुल पवनला सोबत घेऊन दुचाकीने सतत तीन दिवस एकेक जिल्हा पालथा घालत होता. सुमारे ३० जणांची पोलीस पथके त्याच्या मागावर होती. अखेर तिसऱ्याच दिवशी त्याला नगर येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले.दरम्यान, त्याने नागपूर, अकोला, जालना, औरंगाबाद आणि नगर असा प्रवास केल्याचे उघड झाले. नगर येथे एका ट्रॅव्हल्समधून उतरताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत पवनही होता. राहुलची ओळख पटविण्याकरिता पोलिसांनी राहुलकडून फसवणूक झालेला हिंगोली जिल्ह्यातील वैभव देशमुख याला सोबत घेतले होते. त्याने राहुलला ओळखताच अटकेची कारवाई करण्यात आली. अपहरणकर्ता राहुलसह पवनला घेऊन बुधवारी पोलीस पथक वर्धेत दाखल झाले. राहुल हा गुन्हे करण्यात तरबेज आहे. धुळे, वर्धा आणि पुणे येथे त्याने फसवणुकीचे गु्न्हे केलेले आहे. यासह वरोरा, नांदेड येथे अपहरणाचेही गुन्हे त्याच्या नावावर आहेत. याप्रकरणात संबंधित पोलिसांना तो हवा आहे. विशेष म्हणजे त्याने खोट्या नावाचा आधार घेत हे गुन्हे केल्याची माहिती वर्धा पोलिसांनी दिली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्यासह हिंगणघाट व वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे, हिंगणघाटचे ठाणेदार मोतीराम बोडखे, कंट्रोल रुमचे पोलीस निरीक्षक बाकल, पोलीस उपनिरीक्षक बोंदरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक, पोलीस निरीक्षक साळवे, पोलीस उपनिरीक्षक मलकापुरे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या पथकाने अपहरणकर्त्याला अटक करण्यात यश मिळविले. (जिल्हा प्रतिनिधी)अन् ममतेचा बांध फुटलापवनचे अपहरण झाल्यापासून सतत डोळ्यात आसवे घेऊन चिंता करण्याशिवाय काहीच हाती नव्हते. पवन कसा आहे, कुठे आहे, याचीही माहिती नाही. अपहरणकर्ता त्याला नीट खाऊ घालत आहे वा नाही हीच सतत चिंता. अशातच पवनची सुटका झाल्याची वार्ता ढगे कुटंबीयांना मिळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पवनला एकदाचे डोळे भरुन केव्हा पाहतो, असे या कुटुंबीयांचे झाले होते. पोलीस पवनला घेऊन वर्धेत दाखल होताच त्याच्या आईने अश्रूंना वाट मोकळी केली. पोटच्या गोळ्याच्या विरहाचे दु:ख काय असते, या भावनिक क्षणाचा प्रत्यय या माय-लेकाच्या भेटीने उपस्थितांना आला.पवनला अपहरणाची कल्पनाच नव्हतीपवन हा राहुलच्या अंगाखांद्यावर खेळायचा. राहुलनेही त्याला आपण तुझ्या आई-वडिलांना भेटण्याकरिता पंढरपूरला जात असल्याचे सांगितले. दरम्यान पवनची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करीत होता. आपले अपहरण झाल्याची कल्पनाही आरोपीने पवनला येऊ दिली नाही.दादाला मारू नकाअपहरणकर्त्या राहुलला अटक करताच त्याला पोलीसी हिसका दाखविला, तेव्हा ‘दादाला मारु नका’, अशा शब्दात पवन पोलिसांची विनवणी करीत होता. हे बघून पोलिसांनाही त्याची दया येत होती.अपहरणासारख्या गुन्ह्याचीही पार्श्वभूमीराहुल शेंडे (२५) रा.बावणे ले-आऊट जिजाबाई वॉर्ड वरोरा जि. चंद्रपूर हा इयत्ता बारावीत नापास झाला होता. अशातच त्याने वरोऱ्यातील व्यवहारे आडनावाच्या एका गृहस्थाच्या मुलाचे अपहरण करुन २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी वर्धेतील केळकर वाडीतून त्या मुलाची त्याच्या तावडीतून सुटका केल्याची पोलिसात नोंद आहे.एकेक गुन्हे करीत असताना तो नांदेड येथे एका घरी भाड्याने राहात होता. दरम्यान त्याने शेजारच्या एका मुलाशी गट्टी करुन त्याचेच अपहरण केले. अटक होण्याची भीती लक्षात येताच तो त्या मुलाला माहुरला सोडून पसार झाला होता.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नांदेड येथे गुन्हा दाखल आहे.