शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील अपहृत बालिका सांगलीत सापडली

By admin | Updated: September 1, 2014 01:50 IST

मुंबईत तीन दिवसांपूर्वी यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा छडा रविवारी सांगलीत लागला

सांगली : मुंबईत तीन दिवसांपूर्वी यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा छडा रविवारी सांगलीत लागला. तिचे अपहरण करणाऱ्या भाग्यश्री संतोष पाटील (३५, रा. विजापूर, कर्नाटक) या महिलेस अटक करण्यात आली आहे.मुंबईच्या गिरगावमध्ये राहणाऱ्या सलमा शेख हिची मुलगी यास्मिन ही २९ आॅगस्टला घराजवळ खेळत होती. भाग्यश्रीही तिथेच राहते. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत यास्मिनचे अपहरण झाले होते. सलमाने तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेच सापडली नव्हती. त्यामुळे रात्री उशिरा त्यांनी व्ही.पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याचा तपास करीत असताना गुन्हे अन्वेषण विभागाला भाग्यश्रीही गायब असल्याचे समजले होते. त्यांनी यास्मिन व भाग्यश्रीचे छायाचित्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून शोध घेण्याचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिसांनाही हे छायाचित्र मिळाले होते. रविवार सकाळी गोकूळनगरमध्ये एक महिला लहान मुलाला घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याकडे असलेल्या फोटोवरून ही महिला भाग्यश्री पाटीलच असल्याचे समजले. तिच्यासोबत यास्मिनही होती. पोलिसांनी भाग्यश्रीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यास्मिनचे तिने का अपरहण केले, यासंदर्भात ती काहीही बोलत नाही.पोलिसांनी सायंकाळी मुलीचा ताबा तिच्या आईकडे दिला. भाग्यश्रीला ताब्यात घेऊन गुन्हे अन्वेषण पथक रात्री उशिरा मुंबईला रवाना झाले. (प्रतिनिधी)