शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर....५००च्या ५० लाख नव्या नोटा आल्या नाशिक प्रेसमधून

By admin | Updated: November 13, 2016 11:56 IST

चलनाच्या कमतरतेने गेले पाच दिवस नागरिक बँक आणि एटीएम बाहेर रांगेत उभे राहून त्रस्त असताना नाशिकमधील प्रतिभूती मुद्रणालयाकडून दिलासा देणारी बातमी आली आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. १३ - चलनाच्या कमतरतेने गेले पाच दिवस नागरिक बँक आणि एटीएम बाहेर रांगेत उभे राहून त्रस्त असताना नाशिकमधील प्रतिभूती मुद्रणालयाकडून दिलासा देणारी बातमी आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार नाशिक प्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ५०० रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली आहे. शनिवारी रात्री उशीरा नाशिक प्रेसने ५०० रूपयांच्या ५० लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवल्या आहेत.

हाती आलेल्या वृत्तानुसार पाचशे रूपयांच्या नोटांच्या या पहिल्या खेपेनंतर बुधवारी अजून ५०० रूपयांच्या ५० लाख नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नाशिक प्रेसकडून पाठवण्यात येणार आहेत. याबरोबरच, नाशिक प्रेसकडून, २०, ५० आणि १०० रूपयांच्या नोटा छापण्याची संख्या वाढवण्यात आली आहे. देशात असणाऱ्या नऊ नोट छापण्याच्या कारखान्यापैकी नाशइक येथिल एक कारखाना आहे.

नवीन पाचशेची नोट ही रद्द केलेल्या ५00 च्या नोटेपेक्षा कमी आकाराची राहणार आहे. यापूर्वी एक शीटमध्ये ५00 च्या ३६ नोटा छापल्या जात होत्या. आता नवीन पाचशेच्या नोटेचा आकार कमी केल्याने एका शीटमध्ये ५0 नोटा छापल्या जात आहे. पूर्वीच्या नोटेमध्ये उजव्या बाजूला असलेला गांधीजींचा फोटो आता नवीन नोटेमध्ये कमी आकारात डाव्या बाजूला राहणार आहे. तर नोटेमधील वॉटरमार्क आता उजव्या बाजूला राहणार आहे. नोटेवर छापलेल्या क्रमांकाच्या जागेतदेखील बदल करण्यात आला आहे.