शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

.. तर खिरपुरीला ‘खीर-पुरी’चे जेवण!

By admin | Updated: November 18, 2016 23:39 IST

हगणदरीमुक्त गावासाठी अकोला जिल्हाधिका-यांची अनोखी संकल्पना.

संतोष येलकरअकोला, दि. १८- येत्या डिसेंबर अखेरपर्यंत खिरपुरी गाव हगणदरीमुक्त झाल्यास नवीन वर्षात १ जानेवारी रोजी गावात 'खीर-पुरी'चे गावजेवण करण्याची अनोखी संकल्पना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ग्रामसभेत मांडली.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्च २0१८ पर्यंत अकोला जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी यावर्षी जिल्ह्यात ठरविण्यात आलेले शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या घरांमध्ये शौचालय बांधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये गावागावांना भेटी देऊन, शौचालयांचे बांधकाम व त्याचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत विविध प्रकारच्या संकल्पना मांडून शौचालय बांधकामांसंबधी ग्रामस्थांचे प्रबोधन करीत आहेत. गत रविवारी १३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी अकोल्यापासून सायकल चालवित बाळापूर तालुक्यातील खिरपुरी गावाला भेट दिली. ग्रामसभेत त्यांनी शौचालयांचे बांधकाम आणि त्याचा नियमित वापर करण्याचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. एवढंच नाही, तर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत खिरपुरी गाव हगणदरीमुक्त झाले पाहिजे. डिसेंबर अखेरपर्यंत गाव हगणदरीमुक्त झाल्यास, गावाच्या नावाप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी गावात ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'खीर-पुरी'चे जेवण ठेवण्यात येईल असेही असेही त्यांनी जाहीर केले.

शौचालय बांधकामाला आली गती!जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामसभेत केलेल्या आवाहनानुसार बाळापूर तालुक्यातील खिरपुरी गावात शौचालय नसलेल्या घरी शौचालय बांधकामांना गती आली आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांनी शौचालय बांधकामांसाठी पुढाकार घेत शौचालयांची कामे सुरू केली आहेत.- खिरपुरी येथे ग्रामसभेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ३१ डिसेंबरपर्यंत गाव हगणदरीमुक्त झाल्यास गावात 'खिर-पुरी'चे जेवण देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत खिरपुरी गाव हगणदरीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत गाव हगणदरीमुक्त होईल असा विश्‍वास वाटतो.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.