शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंना झोटींग समितीचा झटका, आदेश मागे घेण्यास नकार

By admin | Updated: April 27, 2017 21:00 IST

भोसरी येथील जमीन गैरव्यवहारची चौकशी करीत असलेल्या डी. झोटींग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसेंचे सर्व अर्ज फेटाळून लावले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 -  भोसरी येथील जमीन गैरव्यवहारची चौकशी करीत असलेल्या डी. झोटींग समितीने माजी मंत्री एकनाथ खडसेंचे सर्व अर्ज फेटाळून लावले. यामुळे चौकशीची प्रक्रिया लांबविणीवर नेण्यासोबत सक्षम साक्ष, पुरावे सादरकरण्याचा त्यांचा दुसरा प्रत्यनही फसला. परंतु काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा मात्र खडसेंना दिली आहे. यावर २९ एप्रिल ला अंतिम सुनावणी होणार आहे.महसूल मंत्री असताना एकनाथ खडसेंनी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा पदाचा वापर करून आपल्या नातेवाईकांना कमी दरात दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावालागला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायधीश डी. झोटीेंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली. समितीने पुणेचे जिल्हाधिकारी, महसूल व एमआयडीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविली. त्याच प्रमाणे एकनाथ खडसेंचीही साक्ष नोंदविली. दरम्यान खडसेंनी पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांना उलट तपासणीसाठी परत बोलाविण्यासोबत समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेतला. समितीने जिल्हाधिकाऱ्यांना बोलाविण्यास नकार दिला. तर दुसरा अर्जावर अंतिम निर्णयावेळी निर्णय देणार असल्याचा आदेश दिला. या आदेशावर आक्षेत घेत तो मागे घेण्यासाठी खडसेंनी पुन्हा नव्याने अर्ज केला. यावर सुनावणी घेत हा आदेश मागे घेण्यास नकार देत खडसेंचा अर्ज फेटाळून लावला. प्रत्यक्ष कागदपत्राद्वारे मिळालेली माहिती, स्पष्टीकरणआणि समितीसमोर दिलेली साक्ष अंतर आहे. समितीसमक्षही साक्ष वेळोवेळी बदल्याचे समितीने आदेशात नमूद केल्याची माहिती आहे. काही मुद्दे उरल्यास ते मांडण्याची मुभा खडसेंना दिली आहे. २९ ला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती एमआयडीसीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चंद्रशेखर जलतारे यांनी दिली.