शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

खरीप धोक्यात!

By admin | Updated: June 30, 2016 01:37 IST

या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे.

पुणे : या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी आजपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.हवामान विभागाने वेळोवेळी वर्तवलेल्या आंदाजानुसार चांगला पाऊस या वर्षी पडेल, असे सांगितले गेले. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. कृषी विभागानेही तयारी करून तालुक्यानुसार बैैठका घेऊन नियोजन सांगितले. मात्र, गेला महिनाभर पाऊस हुलकावणीच देत आहे. सुरुवातीला भात उत्पादकांनी धूळवाफेवर काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच येत नसल्याने त्या वाया जातात की काय, असा पेच निर्माण झाला होता. पण, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काहीसा पाऊस झाल्याने त्या पेरण्या वाचल्या. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी पेरण्या कराव्या की नाही, अशा विवंचनेत सापडला आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जूनपासून २८ जूनपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी तो २२७.२१ मिलिमीटर झाला होता. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाला निम्मी सरासरी गाठता आली नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)पाऊस हुलकावणी देत असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत उसासह फक्त ४.३७ टक्के इतक्यात क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.सर्वाधिक पाऊस इंदापूरला१ जून पासून जिल्ह्यात आतापर्र्यत सर्वाधिक पाउस इंदापूर तालुक्यात झाला असून तो १५७.७0 मिलीमीटर इतका आहे. तर त्यानतर वेल्हे तालुक्यात १0८.७0, मुळशी तालुक्यात १0८.७0 तर मावळ तालुक्यात १0५.३0 मिलीमीटर इतका पाउस झाला आहे. तर सर्वात कमी हवेलीत २७.१0 तर आंबेगावमध्ये ३६.९0 मिलीमीटर पाऊस झाला आहे. भात उत्पादक चिंतेतखरीप हंगामात भात हे पीक सर्वाधिक सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. या वर्षीच्या नियोजनात ५५ हजार हेक्टरवर ते घेण्याचे ठरविले होते. जून महिन्यात भाताचा जवळपास १०० टक्के क्षेत्रावर पेरण्या होतात; मात्र या वर्षी सरासरीच्या फक्त ७२९.५ हेक्टरवरच पेरण्या झाल्या असून, ती टक्केवारी ४.८ इतकीच आहे. पावसाची कृपा झाली नाही, तर यंदा भात उत्पादकांवरही संकट येण्याची शक्यता आहे.