शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक विमा टक्केवारीत वाढ आवश्यक!

By admin | Updated: June 30, 2015 02:22 IST

शेतकऱ्यांनी शंभर टक्के पीक विमा काढण्यासाठी पीक विमा जोखीम स्तरात ८० टक्के वाढ करणे गरजेचे असल्याने कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाला नव्याने अभ्यास करावा लागणार आहे.

राजरत्न सिरसाट , अकोलाशेतकऱ्यांनी शंभर टक्के पीक विमा काढण्यासाठी पीक विमा जोखीम स्तरात ८० टक्के वाढ करणे गरजेचे असल्याने कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाला नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. याकरिता येत्या जुलै महिन्यात या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मंथन होणार असल्याचे वृत्त असून, पीक विमासंदर्भात खरीप हंगामातील सर्वंच पिकांचा येत्या वर्षात अभ्यास करण्यात येणार आहे.पीक उत्पादनात येणारी अनियमितता भरू न काढण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यास मदतदायक ठरत असल्याचा निष्कर्ष डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्रज्ञांनी गेल्यावर्षी काढला असून, रब्बी पीक विमा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. पावसाची वाढलेली अनियमितता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अलीकडे पिकांचे उत्पादन घटण्याचे प्रमाण वाढले आहे. पण विमा नुकसानभरपाईची जोखीम स्तराची टक्केवारी मात्र जुनीच आहे. सध्या उंबरठा उत्पन्नाच्या ६० टक्केपेक्षा कमी उत्पादन आल्यास नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरतो. म्हणजेच पीक कापणी प्रयोगातील सरासरी उंबरठा उत्पन्नाच्या जितक्या टक्क्यांनी कमी येईल तेवढ्या प्रमाणात विमा संरक्षित रक्कम आधार धरू न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. शेतकऱ्यांना ही भरपाई उत्पादन खर्चाच्या तुलनेत त्रोटक वाटत असल्याने पीक नुकसानाचा जोखीम स्तर हा ६० टक्क्याहून ८० टक्के होणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने रब्बी पीक विम्याचा अभ्यास केला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. पण रब्बीसह खरीप हंगामातील पिकांचा अभ्यास करू न शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीनुसार नुकसानभरपाई मिळण्याची गरज शेतकरी वर्गातून अधोरेखित करण्यात येत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी अर्थशास्त्र विभाग नव्याने अभ्यास करणार असल्याचे वृत्त आहे.-राज्यात १५ वर्षांपासून रब्बी पिकासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात येत असून, याच अनुषंगाने कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाने रब्बीतील हरभरा पिकाचा पीक विमा काढणाऱ्या शेतकरी गटांचा गेल्या वर्षी अभ्यास केला असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची हमी मिळाल्याचे दिसून आले आहे.राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत येणाऱ्या रब्बी हंगामातील हरभरा या पिकाचा गेल्यावर्षी अभ्यास केला आहे. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळाली आहे. नुकसानीचा जोखीम स्तर वाढवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, त्यादृष्टीने खरीप हंगामातील सर्वच पिकांचा अभ्यास करण्यात येणार आहे.- डॉ. राजेंद्र देशमुख, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.