शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

कचऱ्याच्या गंभीर समस्येवरून खारघरवासी रस्त्यावर उतरणार!

By admin | Updated: September 24, 2016 02:39 IST

सिडकोच्या नोडमध्ये विशेषत: खारघर नोडमध्ये सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.

पनवेल : सिडकोच्या नोडमध्ये विशेषत: खारघर नोडमध्ये सध्या डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शेकडो संशयित रुग्ण विविध खासगी रु ग्णालयात डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांवर उपचार घेत आहेत. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यासंदर्भात रविवार, २५ सप्टेंबर रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी रहिवाशांच्या तक्रारींवर चर्चा करून सिडकोविरोधात आंदोलन छेडले जाणार आहे. खारघरसह सिडकोच्या इतर नोडमध्ये कचरा उचलण्याचे काम बीव्हीजी ही खासगी कंपनी करते. मात्र कर्मचाऱ्यांची निदर्शने, कचरा उचलण्यात असलेला अनियमतिपणा यामुळे शहरात कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. काही विभागात दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सिडकोचा आरोग्य विभाग साथीच्या आजारावर लगाम घालण्यासाठी जनजागृती, धुरीकरणावर भर देत आहे. मात्र कचऱ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने साथीचे आजार पसरत असल्याचे भाजपा पनवेल ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय पाटील यांचे सांगितले. खारघरमधील रहिवाशांची सभा आयोजित करून कचरा, भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव, शहरातील खड्डे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यासंदर्भात सिडकोला निवेदन देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शहरातील सेक्टर १९ मधील साई सदन इमारतीसमोरील कचरा उचलण्यासाठी अनेकदा सांगण्यात आले असले तरी सिडकोकडून दखल घेतली जात नसल्याचे रहिवासी नलिनी कुलकर्णी यांनी सांगितले. या रहिवासी संकुलातील अनेक जण साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. मात्र तक्रार करूनही सिडकोकडून चालढकल करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)>वेळच्यावेळी कचरा उचलला जात नसल्याने परिसरात साथीचे आजार वाढले आहेत.