नवी मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेला खारघरचा टोल नाका अखेर सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला आहे. टोल वसुलीतून खारघर ते पनवेलपर्यंतच्या रहिवाशांना सूट देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सायन पनवेल टोलवेज प्रा. लि. कंपनीच्यावतीने टोल वसुली करण्यात येणार आहे. पुणे, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या आणि त्या मार्गावरून मुंबई-ठाण्यात येणाऱ्या वाहन चालकांना आता आणखी एक टोल भरावा लागणार आहे.
खारघरचा टोल अखेर सुरू
By admin | Updated: January 6, 2015 02:47 IST