शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खारघर ठरणार मुख्य अडसर

By admin | Updated: April 28, 2016 03:07 IST

प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा आराखडा तयार झाला असला तरी त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही.

पनवेल : प्रस्तावित पनवेल महानगरपालिकेचा आराखडा तयार झाला असला तरी त्याला अंतिम स्वरूप आलेले नाही. महानगरपालिकेत खारघर नोड समाविष्ट करण्यास सिडकोने विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर नैना हद्दीतील गावे सुध्दा देण्यास मनाई केली जात आहे.. खारघरचा मुद्दा प्रस्तावित महानगरपालिकेच्या आड येत आहे. त्यामुळे समितीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.पनवेल नगरपालिका आणि प्रस्तावातील गावांची लोकसंख्या आठ लाखांवर पोहचली आहे. भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या सिडकोकड़ून पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष पुरवले जात नाही. पाणी, रस्ते, त्याचबरोबर इतर अनेक समस्या सिडको नोडमध्ये आहेत. कामोठ्यातील परिस्थिती अतिशय बिकट असून कळंबोली, खारघरची स्थिती फारशी वेगळी नाही. नवी मुंबई महापालिकेला जसे सिडकोने नोड वर्ग केले, त्याच धर्तीवर पनवेल परिसरातील नोड प्रस्तावित पनवेल महापालिकेला द्यावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. ही मागणी लावून धरण्याकरिता चौकाचौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या संदर्भात प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये महापालिकेची मागणी करण्यात आली होती. नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पालिकेने सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पुरवली. मात्र तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव नगरविकास विभागाला प्राप्त झाला नव्हता. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यतेखाली समिती गठीत केली. नव्याने डाटा तयार केला आहे. एकूण ७० गावे व सिडको वसाहतींना महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याचा प्रस्ताव आहे. पालिकेची हद्द, नवीन हद्द, उत्पादनाची साधने, पायाभूत सुविधा, भविष्यात लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार केला आहे. ११ एप्रिल रोजी या संदर्भात अंतिम बैठक होणार होती. मात्र ही बैठक रद्द झाल्याने मसुदा सादर करण्यात आला नाही. याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झाला नाही.त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्यात अडथळे येत आहे. (वार्ताहर )