शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून झाला बंद

By admin | Updated: May 14, 2017 08:00 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. यासोबतच ठाण्यातील खारेगाव टोलनाका राज्यातील बंद होणारा पहिला टोलनाका ठरला.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 14 - मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. टोलनाका बंद झाल्याने वाहनचालकांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. 
 
 मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोलनाका बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे.  आय़आरबी कंपनीला 180 कोटी रुपये  वसूल करायचे होते. प्रत्यक्षात कंपनीनं यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं टोलवसुली केल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी टोलनाका बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळालं आहे.
 
मुंबईहून नाशिककडे जाताना ठाण्यानंतर लागणारा पहिला टोल नाका म्हणजे भिवंडी बायपासवरील खारेगावचा टोल नाका. येथून दिवसाला हजारो वाहने ये-जा करतात. त्यातून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल मिळतो. 1998 साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चापोटी 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते.
आय़आरबीने हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय मध्यरात्रीपासून घेतला.  
 
चालकांना दिलासा-
खारेगाव हा राज्यातील पहिलाच टोल नाका आहे. टोलवसुली बंद झाल्यामुळे 13 मे पासून वाहनचालकांना टोल भरण्याची गरज नाही, त्यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 1998 साली राज्यातील हा टोल नाका सर्वप्रथम उभारण्यात आला होता.