शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

खोरला पाणी मिळाले; पण जलपूजनापुरते

By admin | Updated: September 22, 2016 02:06 IST

अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) गावाला जनाई-शिरसाई योजनेचे पाणी मिळाले

खोर : अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) गावाला जनाई-शिरसाई योजनेचे पाणी मिळाले; पण फक्त जलपूजनापुरतेच. हे पाणी आल्याने येथील शेतकरी सुखावला होता; मात्र हा आनंद पाण्याबरोबर वाहून गेला. येथील फडतरेवस्ती तलावात रविवारी पाणी पोहोचले आणि मंगळवारी (दि. २0) पाणी बंद करण्यात आले. खोर परिसरातील शेतकऱ्यांनी फडतरेवस्ती तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून देण्याची मागणी केली होती. तलाव पूर्ण भरून सांडव्यातून पाणी जर ओढ्याला गेले नाही, तर पूर्व भागामधील शेतकऱ्यांना काहीच फायदा या तलावापासून होणार नव्हता, तसेच झाले आहे. पाणी फक्त जलपूजनापुरतेच सोडले का, असा सवाल शेतकरी करीत आहेत. आता पुरंदर जलसिंचन उपसा योजनेचे पाणी हे डोंबेवाडी पाझर तलावात कधी सोडतात या कडे सर्वांचे लक्ष लागल आहे. हा तरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. तसेच, आणखी वाढीव पाणी फडतरेवस्ती तलावात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत जनाई-शिरसाई जलसिंचन उपसायोजनेचे व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता अशोक कुवर म्हणाले, फडतरेवस्ती तलावात दोन दिवस पाणी सोडण्यात आले आहे. पुरंदर व बारामती तालुक्यातील बरीच गावे ही पाणी सोडण्याची वाट पाहत आहेत. राजुरी, बोरकरवाडी, आंबी, पांडेश्वर या गावांनादेखील पाणी देणे गरजेचे आहे. यांना पाणी दिले नाही तर लगेचच पाणी चोरी करणे, दमदाटी करणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व गावांना समान पाणी सोडण्यात आले असून, नंतर खोरच्या पद्मावती तलावात पाणी सोडण्यात येईल. सध्या लिकेजद्वारे २ क्युसेक्स पाणी पद्मावती तलावात चालू असल्याचे कुवर यांनी सांगितले आहे.(वार्ताहर)>जलपूजन करायला नको होतेआमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून जनाई-शिरसाई योजनेचे पाणी सोडण्यात आले; मात्र लगेचच जलपूजन करायला नको होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, दरवर्षीची गत आहे की जलपूजन झाले की अधिकारी म्हणतात पाणी पोहोचले आहे. खोरला आता पाणी बंद केले तरी चालेल, अशीच समजूत योजना अधिकाऱ्यांची झाली आहे.>टँकरदेखील झाला बंद फडतरेवस्ती तलाव हा पूर्ण क्षमतेने भरून मिळावा, अशी माफक अपेक्षा या भागातील जनतेची होती; मात्र जनतेच्या सर्वच अपेक्षा फोल ठरल्या. >एकीकडे सिंचन योजनेचे पाणी बंद करण्यात आले, तर दुसरीकडे गावाला पाणीपुरवठा करणारे टँकरदेखील बंद झाल्याने खोर गाव हे अधीकच पाण्याच्या अडचणीत सापडले आहे.