शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खोटा अहवाल देणा-या डॉक्टरांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:59 IST

भायखळा येथील आॅर्थर रोड कारागृहामधील महिला शिक्षाबंदी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी, खोटा अहवाल देणा-या आकस्मिकता (कॅज्युलिटी) वैद्यकीय अधिका-याने कर्तव्यात कुचराई केली

मुंबई : भायखळा येथील आॅर्थर रोड कारागृहामधील महिला शिक्षाबंदी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी, खोटा अहवाल देणाºया आकस्मिकता (कॅज्युलिटी)वैद्यकीय अधिकाºयाने कर्तव्यात कुचराई केली असेल, तर चौकशी केली जाईल, तसेच न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाºया वैद्यकीय अधिकाºयाला निलंबित करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.प्राथमिक अहवालानुसार, या प्रकरणी महिला तुरुंगाधिकारी, अधीक्षक, तसेच पाच महिला शिपाई यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी सगळी चौकशी पारदर्शक पद्धतीने होईल, यामध्ये कोणाही दोषीला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणी राज्य महिला आयोगामार्फत सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली निवृत्त पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ता असे सदस्य असणारी चौकशी समिती गठित करण्यात आली असून, समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. राज्यातील ६४२ जामीन मिळालेल्या कैद्यांना सुटकेसाठी शासन स्तरावर निधी व अर्थसहाय्यकरण्यात येईल. न्यायाधीन बंदीच्या मृत्युंची माहिती घेऊन ती पटलावर ठेवण्यात येईल, असेही डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. प्रत्येक कैद्याला त्याच्या गरजेनुसार योग्य उष्मांकांचा आहार देण्यात येणार असून, कैदीनिहाय आहारावर होणारा दैनंदिन खर्च वाढविण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना वाचविण्यासाठी वर्गणी म्हणून पैसे गोळा करण्याचा संदेश पसरविणाºया व्यक्तीवर सायबर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्यात येईल. इंद्रायणी मुखर्जीला जेलमध्ये पुरविण्यात येणाºया विशेष सुविधांबद्दल चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कारागृह सुधारणासंबंधी न्या. धर्माधिकारी समितीच्या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सदस्य सर्वश्री जयंत पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अजित पवार आदींनी सहभाग घेतला.कारागृहात इंद्राणीचा मसाज, फेशियल : भाजपाचे आमदार अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मंजुळा शेट्ये मृत्युप्रकरणी खोटा अहवाल देणाºया जे. जे. रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय, शेलार यांनी धक्कादायक माहिती सभागृहासमोर आणली. आॅर्थर रोड कारागृहातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने या प्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून, इंद्राणी कारागृहात मसाज, पॅडिक्युअर, फेशियल अशा सुविधा घेत होती. त्यामध्ये मंजुळा तिला मदत करत होती. त्यामुळे ही बाब गंभीर असून, त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.