शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला खिंडार; आझम पानसरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश

By admin | Updated: January 9, 2017 01:20 IST

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी

ऑनलाइन लोकमत,
 पिंपरी, दि. 9 -  भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी  रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. 
 पिंपरी चिंचवड  महापालिका निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादीची चारही बाजूने घेराबंदी केली असून, आता महापालिकेत राष्ट्रवादीची हॅट्रटिक होणे अवघड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. बालेकिल्ल्यातच भाजपने राष्ट्रवादीला नामोहरम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी महापालिका निवडणुकीची वाट बिकट बनली आहे. 
राष्ट्रवादीत राजकीय अस्तित्वासाठी झगडूनही काहीच हाती न लागल्यामुळे आझम पानसरे गेल्या काही वर्षांपासून नाराज होते. विशेषतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व आमदार अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत ते जाहीरपणे नाराजीही व्यक्त करत होते. मात्र त्यांना राजकीय मार्ग सापडत नसल्यामुळे चाचपडत होते. त्यातून त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन परत राष्ट्रवादीची वाट धरली होती. विधान परिषद निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते पक्षाच्या व्यासपीठावरूनही गायब झाले होते. अखेर त्यांनी रविवारी रात्री भाजपची वाट धरली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे या दोघांनीही प्रयत्न केले. गेल्या आठवडय़ात याबाबत चर्चा होती ती चर्चा आता खरी झाली.