शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव - पोस्ट आॅफीसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!

By admin | Updated: November 17, 2016 20:22 IST

ऑनलाइन लोकमत खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 17 : एक हजार आणि पाचशेच्या चलनी नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट ...

ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 17 : एक हजार आणि पाचशेच्या चलनी नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्याचा ओघ कमालिचा वाढला आहे. दरम्यान, पती राजांपासून लपविलेल्या लक्षावधी रुपयांचाही बचत आणि आवर्ती ठेव म्हणून जमा करण्याचा प्रयत्न महिला वर्गाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये खामगाव पोस्ट आॅफीसमध्ये तब्बल एक कोटी ६६ लक्ष ८० हजार ९०८ रुपयांची ठेव जमा झाली आहे.काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार ०९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

या नोटा ३० डिसेंबरपर्यंत पोस्टात किंवा बँकेत जमा कराव्या लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी हा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेच शहरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी, काहींनी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, गुरूवार १० नोव्हेंबरपासून नागरिकांचा राज्यातील विविध पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्यासाठी ओघ सुरू झाला.

खामगाव येथील पोस्ट आॅफीसमध्ये बुधवार म्हणजेच १६ नोव्हेंबरच्या सायंकाळ पर्यंत तब्बल एक कोटी ६६ लक्ष ८० हजार ९०८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे. यामध्ये ठेव जमा करणाऱ्यांमध्ये महिला वर्गाचा प्रामुख्याने कल दिसून येत आहे. त्यामुळे पती राजांपासून लपविलेली लक्षावधी रुपयांची रक्कम पोस्ट आॅफीसमध्ये ठेव म्हणून ठेवल्या जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हजार आणि पाचशेच्या चलनी नोटा चलनातून बाद झाल्यानंतर, पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून गुंतविण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. यामध्ये महिला वर्गाची विशेष गर्दी असून, बुधवारपर्यंत १ कोटी ६६ लक्ष ८०९०८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे.- व्ही.एस.हिवराळेपोस्ट मास्तर, पोस्ट आॅफीस खामगाव.

 

 

https://www.dailymotion.com/video/x844ihr