शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत खामगाव केंद्र राज्यात दुसर्‍या स्थानी

By admin | Updated: March 27, 2017 02:40 IST

७३ हजार क्विंटल तुरीची हमीदराने खरेदी

गिरीश राऊत खामगाव, दि. २६- केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीदरानुसार, राज्यात तुरीची खरेदी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. यापैकी विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या राज्यातील ३३ केंद्रांपैकी सर्वात जास्त तूर खरेदी लातूरनंतर बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव येथील केंद्रावर करण्यात आली आहे. या केंद्रावर २३ मार्चपर्यंत ७३ हजार ४३५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यापोटी ३७ कोटी ८ लाख ३५ हजार रुपयांचे चुकारे झाले असून, यापैकी २५ कोटी १0 लाख ४४ हजार ७४0 रुपयांचे चुकारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. हमीदर योजनेंतर्गत तुरीची खरेदी ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल या दराने दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. (नाफेड) तसेच विदर्भ मार्केंटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन (व्हीसीएमएस)मार्फत करण्यात येत आहे. व्हीसीएमएसमार्फत राज्यात ३३ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे उघडण्यात आली. राज्यात तुरीची मोठी बाजारपेठ समजल्या जाणार्‍या लातूर येथील केंद्रावर यावर्षी सर्वात जास्त ९५ हजार ३९३ क्विंटल एवढी तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सर्वात जास्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील केंद्रावर ७३ हजार ४३२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूणच राज्यात सर्वात मोठी म्हणून बाजारपेठ म्हणून लातूर आहे; मात्र यावर्षी खामगाव येथील केंद्रावर झालेली तूर खरेदी विक्रमी ठरत आहे. खामगाव येथील केंद्रावर अद्याप तुरीचे मोजमाप सुरूच असून, आवक वाढल्याने या केंद्रावर गत २७ फेब्रुवारीपासून आवक थांबविण्याबाबत विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे येथील केंद्रावर एक महिन्यापासून आवक थांबली आहे, तर विक्रीस आणलेल्या तुरीचे मोजमाप होण्यास महिन्याचा कालावधी लागत आहे.