शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खाकी म्हणे ‘क्लोज’; पण मटका ‘ओपन’च !

By admin | Updated: November 9, 2014 23:40 IST

‘प्यादी’ गळाला लागली तरी ‘वजीर’ पटावरच असल्याने टपऱ्यांतला हा आकड्यांचा खेळ ‘ओपन’च चालतोय.

संजय पाटील - कऱ्हाडातल्या बहुतांश पानपट्ट्यांमध्ये एकवेळ ‘पान’ मिळायच नाही; पण ‘चिठ्ठी’ हमखास मिळेल. मुळात पानसुपारीसाठी त्या टपऱ्या चालतच नाहीत. फक्त आकड्याच्या खेळासाठीच त्या ‘फेमस’ झाल्यात. क्वचित एखाद्या बुकीवर पोलिसांकडून कारवाई होते. त्यानंतर मटका ‘क्लोज’ झाल्याचंही पोलीस म्हणतात; पण ‘प्यादी’ गळाला लागली तरी ‘वजीर’ पटावरच असल्याने टपऱ्यांतला हा आकड्यांचा खेळ ‘ओपन’च चालतोय. आभाळच फाटलं तर ठिगळ कुठं लावायचं, असा प्रश्न पडतो. कऱ्हाड शहर पोलिसांचीही सध्या हीच अवस्था आहे. शहरात सर्वकाही आलबेल असल्याच दिसतंय; पण दारू, मटका आणि वडापवाल्यांनी शहराला जेरीस आणलंय. शहरात मटका चालत नसल्याची ‘आवई’ वेळोवेळी पोलिसांकडून उठविली जाते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश पानटपऱ्यांमध्ये मटका चालत असल्याचं दिसतं. यापूर्वी शहरात मटक्याचे मोठे वलय होते. मात्र, त्यावेळी शहर पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेत ‘खंबीर’ अधिकारी कार्यरत असल्याने त्यांनी काही प्रमाणात बुकींच्या मुसक्या आवळल्या होत्या. कारवाईच्या सत्रामुळे त्यावेळी बुकींचे धाबेही दणाणले होते. त्यातूनच मटक्यालाही काही अंशी आळा बसला होता. मात्र, त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात रूजू झालेल्या अधिकाऱ्यांनी याकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. त्यामुळे मटकाबाजार पुन्हा फोफावल्याचे दिसून येते.मटका बुकींवर दहशत बसविण्यास पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. अनेक महिने त्यांनी मटका व त्याअनुषंगाने होणाऱ्या अवैध धंद्यांकडे कानाडोळा केला आहे. शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कऱ्हाड शहर पोलिसांची ‘खास’ पथके आहेत. मात्र या पथकांकडूनही मटका दुर्लक्षित असल्याचे दिसते. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा अवैध दारूविक्री अथवा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून १०० ते २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईची कागदपत्रे तयार करण्यासाठी पेनही झिजवले आहेत. मात्र, लाखोंची उलाढाल होणाऱ्या मटका व्यवसायाविरोधात पाऊल उचलण्याचे धाडस ‘डीबी’च्या अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी दाखविलेले नाही. तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी मटक्याविरोधात सातत्यपूर्ण कारवाईची गरज आहे.कंबरडे मोडणारेही थंडावले !पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी वारूंजीसह विमानतळ परिसरात मटका अड्ड्यांवर छापे टाकून या बुकींचे कंबरडे मोडले होते. मात्र, त्यानंतर हे पथकही थंडावले. कधीकधी या पथकाकडून बुकींना चाप लावला जातो. मात्र, त्यात सातत्य नसते. मटक्याविरोधात कडक धोरण अवलंबले जात नाही. त्यामुळे कारवाईनंतर काही दिवसांतच हा व्यवसाय पुन्हा डोके वर काढतो. सातत्य नसल्यानेच सध्या बुकींनी पथारी पसरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मुख्य बुकींनी एजंट नेमलेत. या एजंटांमधील काहींनी पानशॉपच्या नावाखाली तर काहींनी हातगाड्यांवर हा व्यवसाय थाटलाय. पानशॉपमध्ये मोबाईलद्वारे तर हातगाड्यांवर चिठ्ठीद्वारे आकडे लावले जात आहेत. काहींनी घरातच मटका घेण्यास सुरूवात केल्याचीही चर्चा आहे.