शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: November 7, 2016 23:44 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ़. मोहन भागवत यांच्याशी तब्बल पाऊण तास बंदद्वार चर्चा केली़.

ऑनलाइन लोकमत

भुसावळ (जि. जळगाव), दि. 7 - माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ़. मोहन भागवत यांच्याशी तब्बल पाऊण तास बंदद्वार चर्चा केली़. रा.स्व. संघाच्या अ.भा. शारिरीक वर्गासाठी डॉ. मोहन भागवत भुसावळात आले आहेत. बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये हा वर्ग सुरू आहे. भागवत व खडसे यांच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी खडसे यांनी दिलेला मंत्रीपदाचा राजीनामा, न्या.झोटींग समितीमार्फत होणारी चौकशी व आता पुढे काय आदी बाबींवर त्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळाली. खडसे यांचा मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. चर्चेवेळी केवळ दोघेच उपस्थित होते हे विशेष. राजीनाम्यानंतरच्या घडामोडीबाबात खडसे यांनी भागवत यांना माहिती दिली व आपली बाजू मांडली तसेच आपल्यावर कसा अन्याय झाला याबाबत भागवत यांना अवगत केल्याचे समजते. दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की डॉ़मोहन भागवत यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली़.दरम्यान, डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी शारीरीक वर्गात सहभागी झालेल्या देशभरातील ४१ प्रांतातील ४६० प्रतिनिधींशी सरसंघचालकांनी संवाद साधला़