शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचे सीडीआर कोणाच्या सांगण्यावरून काढले?

By admin | Updated: June 4, 2016 03:16 IST

जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले

जळगाव/ मुंबई : जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले,असा सवाल करत एटीएसकडून स्टेटमेंटसाठी आपल्यावर दबाव येत असल्याचा आरोप एथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला. दाऊदच्या निवासस्थानावरुन खडसेंना आलेल्या कॉल्सची माहिती दाखवून त्याचा डेमो सादर केला. दाऊदच्या पत्नीच्या क्रमांकावरून खडसेंच्या मोबाईलवर सात वेळा संभाषण झाले आहे. यावेळी मार्च व एप्रिलचे बील त्याने दाखविले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे भंगाळे याने सांगितले.रक्षा खडसेंनी घेतली मोदींची भेटमहसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसेयांनीही गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, अशी माहिती आहे. आपल्या सासऱ्यांविरुद्ध कोण लोक काम करीत आहेत हे त्यांनी मोदींच्या कानीघातल्याचे समजते. ई-मेलचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्नगेल्या तीन दिवसापासून दररोज रात्री दहा वाजता माझ्या ई-मेल आयडीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न कोणाकडून तरी केला जात आहे. याबाबत मी मुंबई पोलिसांना विचारणा केली असता आमच्याकडून असा प्रयत्न होत नाही. गरज वाटेल तेव्हा आम्ही तुमच्याकडून हा पासवर्ड घेऊ शकतो, असे उत्तर मला देण्यातआले. एकूण तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भंगाळे म्हणाला.कृषीमंत्री म्हणून मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करू द्या. विरोधकांकडून नियोजनबद्धपणे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. बिनबुडाच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. प्रसारमाध्यमांनी मला शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करू द्यावे, असे माझे आवाहन आहे. - एकनाथ खडसे, महसूलमंत्रीआंतरराष्ट्रीय कॉल्सचे प्रकरण देशाशी निगडित विषय असताना, खडसे हे केवळ मंत्री व सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्यावर कारवाईस विलंब होत आहे. तसेच जळगावचे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी देशहिताच्या दृष्टिकोनातून सीडीआर काढले असते तर मग एकट्या खडसेंचेच का? अन्य चार जणांचे का काढले नाही, असा सवाल भंगाळे याने केला.>> खडसे-दानवे भेट झालीच नाही !जालना : जमीन खरेदी प्रकरण व इतर आरोपांमुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी खडसे हे खा. दानवे यांची भेट घेणार होते. मात्र आरोग्याच्या कारणास्तव खडसे यांनी भेट न घेता दानवे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांकडून मागविला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो सादर केल्यानंतर अमित शहा यांनी खडसे यांना खा.दानवे यांची भेट घेण्यास सांगितले होते.