शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंनी मांडली झोटिंग समितीसमोर बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 00:48 IST

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

नागपूर : भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. ‘अ‍ॅव्हिडेन्स अ‍ॅफिडेव्हिट’ दाखल केले. महसूलमंत्री पदावर असताना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन नातेवाइकांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप खडसे यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटिंग यांची एक सदस्यीय समिती गठित केली आहे. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून ही समिती चौकशी करीत आहे. चौकशीला होत असलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. समितीकडून आता उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी खडसेंना उलटतपासणीसाठी नोटीस बजावली असून, समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकिलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊण तास त्यांनी आपली बाजू मांडली. मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अ‍ॅव्हिडेन्स अ‍ॅफिडेव्हिट सादर केले. यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)